SHARE MARKET. 
अर्थविश्व

Share Market: दिवसाच्या सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये तेजी; सेन्सेक्स ५० हजारांच्या पुढे 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून तिसऱ्यांदा संसदेत बजेटचं सादरीकरण केलं. बजेट सादरीकरणाच्या आधी, सादर करताना आणि सादर करुन झाल्यावर देखील शेअर बाजारात तेजी दिसून आली. सादरीकरणाच्या तिसऱ्या दिवशी देखील शेअर बाजारात घोडदौड तेजीत सुरु आहे. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 50 हजारांच्या पार गेला आहे. सकाळी साडे नऊच्या सुमारास सेन्सेक्सने 350 अंकाची उसळी घेतली. निफ्टी-50 मध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळाली असून 10 अंकांनी वधारला आहे. सेन्सेक्स 50,231.39 अंकावर पोहोचला आहे, तर एनएसई निफ्टी 14,645 वर गेला आहे.

राष्ट्रवादीचा फडणवीसांना धक्का ते ग्रेटा-रिहानाचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, ठळक...

गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केट ४९ हजारांच्या पुढे कामगिरी करत आहे. मंगळवारी सेन्सेक्स ५० हजारांच्या पुढे गेला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सेन्सेक्स तब्बल 1403 अंकांनी वधारला होता. निफ्टी 406 अंकानी वरती येऊन 14,687.35 वर स्थिर झाली. यापूर्वी 21 जानेवारीला सेनसेक्स 223.17 अकांनी वाढून 50,015.29 वर स्थिरावला होता. तर निफ्टी 14,707.70 च्या स्तरावर गेली होती.

गुंतवणुकदारांना 6.53 लाख कोटी रुपयांचा फायदा

अर्थसंकल्पावेळी शेअर बाजारातमध्ये  तेजीचा सर्वाधिक फायदा गुंतवणूकदारांना झाला. दिवसभरात त्यांना 6.53 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असणाऱ्या सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 1.86 लाख कोटी रुपयांवर होते. मात्र, सोमवारी दिवसभराच्या कारभारानंतर ते वाढून 1.92 लाख कोटी रुपयांच्या पार गेलं. याप्रकारे फक्त एका दिवसाच्या कारभारानंतर गुंतवणूकदारांना 6.53 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला असल्याचं पाहायला मिळालं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate case: माणिकराव कोकाटेंना अद्याप अटक नाही, मध्यरात्री काय घडलं? डॉक्टरांनी काय सांगितलं?

Pune News : पेशवे सृष्टीचे काम रखडले; पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

CM Devendra Fadnavis: फलटणला सर्वात आधुनिक शहर बनवू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टीकाटिप्पणीपेक्षा विकास हा माझा अजेंडा!

Prakash Shinde: ड्रग्ज प्रकरणातून शिंदे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न: प्रकाश शिंदे; अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार!

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

SCROLL FOR NEXT