Share Market Opening esakal
अर्थविश्व

Share Market: नव्या आठवड्यात बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

निफ्टी रियल्टी निर्देशांक या आठवड्यात 3 टक्क्यांनी घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवरही दबाव दिसून आला

साक्षी राऊत

Share Market Opening: शुक्रवारी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. बँक निफ्टी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर घसरला. एफएमसीजी आणि फार्मा शेअर्समध्ये किंचित वाढ झाली, तर सर्वात मोठी घसरण आयटी शेअर्समध्ये दिसून आली. रियल्टी, मेटल शेअर्सवरही दबाव होता. निफ्टीच्या आयटी निर्देशांकात या आठवड्यात 6 टक्क्यांची घसरण झाली. निफ्टी रियल्टी निर्देशांक या आठवड्यात 3 टक्क्यांनी घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवरही दबाव दिसून आला.

सेन्सेक्स 389 अंकांनी घसरून 62182 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 113 अंकांनी घसरून 18497 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 37 अंकांनी वाढून 43633 वर बंद झाला. मिडकॅप 129 अंकांनी घसरून 32375 वर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्समधील 30 पैकी 18 शेअर्स घसरले. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 पैकी 33 शेअर्स ची विक्री झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 7 शेअर्समध्ये घसरण झाली.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

शुक्रवारी बाजारात प्रॉफीट बुकींग दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. आता पुढील आठवड्यात व्याजदरांबाबत यूएस फेडच्या निर्णयाकडे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. चलनवाढ आणि व्याजदर यावर यूएस फेडचे भाष्य बाजारासाठी अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

निफ्टी आणखी कमजोर होण्याची चिन्हे दिसत असल्याचे शेअरखानचे (Share Market) गौरव रत्नपारखी म्हणाले. शॉर्ट टर्ममध्ये, तो 18300-18650 च्या रेंजमध्ये कंसोलीडेशन दिसू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एचसीएल टेक (HCLTECH)

टेक महिन्द्रा (TECHM)

इन्फोसिस (INFY)

विप्रो (WIPRO)

टीसीएस (TCS)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

झिंदाल स्टील (JINDALSTEL)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT