Share Market Opening esakal
अर्थविश्व

Share Market Opening : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

लाल चिन्हावर बंद होऊनही, निफ्टीने 18300 ची महत्त्वपूर्ण पातळी राखण्यात यश मिळविले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Opening : शुक्रवारी सलग दुसऱ्या बाजारात घसरण दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 36 अंकांनी घसरून 18308 वर बंद झाला. पण लाल चिन्हावर बंद होऊनही, निफ्टीने 18300 ची महत्त्वपूर्ण पातळी राखण्यात यश मिळविले.

आता जर निफ्टी या पातळीच्या खाली घसरला तर आपण 18100-18000 च्या दिशेने जाताना पाहू शकतो. आणि जर ते 18300 च्या वर राहिला तर 18450-18500 च्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतो. वीकली टाइम फ्रेमवर, निफ्टीने बियरिश कँडल तयार केली जी स्पिनिंग टॉप फॉर्मेशन सारखी दिसते. जे बाजाराची दिशा स्पष्ट नसल्याचे द्योतक आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

  • शॉर्ट टर्म मोमेंटम इंडिकेटर निगेटिव्ह डायव्हर्जन दाखवत आहे, जे बाजारातील आणखी कमजोरी दर्शवत असल्याचे

  • शेअरखानचे गौरव रत्नपारखी यांचे म्हणणे आहे. शॉर्ट टर्ममध्ये, निफ्टी खाली 18100-18000 च्या दिशेने जाताना पाहू शकतो, तर वरच्या बाजून, निफ्टीचा रझिस्टंस 18450 वर दिसतो. शॉर्ट टर्ममध्ये बाजारात मोठी घसरणही शक्य आहे.

बँकिंग निर्देशांकावर नजर टाकल्यास शुक्रवारी बँक निफ्टी वाढीसह 42546 च्या पातळीवर उघडला. पण, तो 42600 पार करू शकला नाही आणि खाली घसरला. पण, त्याने खालच्या पातळीवर चांगली रिकव्हरी केली आणि व्यवहाराच्या शेवटी तो पुन्हा 21 अंकांनी घसरून 42437 वर बंद झाला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • एनटीपीसी (NTPC)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT