Share Market Update esakal
अर्थविश्व

Share Marketमध्ये अस्थिरता, आयटी अन् बँकीग शेअर्समध्ये मोठी घसरण

सध्या सेन्सेक्स मध्ये चढ उतार दिसून येत आहे. त्यामुळे दिवसभरात बाजारात चढउतार दिसून येण्याची चिन्हे आहे.

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. आज शेअर बाजार हलक्या घसरणीसह सुरू झाला. सेन्सेक्स 75 अंकाच्या घसरणीसह सुरू झाला तर निफ्टी 39 अंकाच्या घसरणीसह सुरू झाला. सध्या सेन्सेक्स मध्ये चढ उतार दिसून येत आहे. त्यामुळे दिवसभरात बाजारात चढउतार दिसून येण्याची चिन्हे आहे.

आज सुरवातीच्या सत्रात 23 शेअर्समध्ये तेजी तर 27 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. विशेष म्हणजे आयटी आणि बँकींग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.

सोमवारी संमिश्र जागतिक संकेतांमुळे बाजारची सुरुवात कमजोर झाली होती. पण जसजसा व्यवसाय वाढत गेला तसतसा बाजार वाढत गेला. बाजार अखेर दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. मोहरमच्या निमित्ताने काल 9 ऑगस्टला बाजार बंद होता.

8 ऑगस्टला अर्थात सोमवारी शेअर बाजार त्यांच्या 4 महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला होता. परकीय गुंतवणूकदारांच्या खरेदीचा परतावा, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट, ऑटो आणि मेटलच्या वाढीमुळे बाजारात पॉझिटीव्ह वातावरण होते. सोमवारी ऑइल-गॅस, आयटी वगळता बीएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये वाढ झाली होती.

सोमवारी व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 465.14 अंकांच्या म्हणजेच 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 58,853.07 वर बंद झाला होता. दुसरीकडे, निफ्टी 127.60 अंकांच्या म्हणजेच 0.73 टक्क्यांच्या वाढीसह 17525.10 वर बंद झाला होता.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • एनटीपीसी (NTPC)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • आयआरसीटीसी (IRCTC)

  • भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT