Share-Market sakal media
अर्थविश्व

Share Market: दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाजारात तेजी, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम

ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये शेअर बाजारातील स्थितीवरुन गुतंवणूकदारांमध्ये निराशा कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम

share market : गेल्या आठवड्याभरापासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये शेअर बाजारातील स्थितीवरुन गुतंवणूकदारांमध्ये निराशा आहे. अशात गुरुवारी हलक्या तेजीसह शेअर बाजार बंद झाला होता मात्र आज शेअर बाजारात पहिल्या सत्रातमध्येच तेजी दिसत आहे.

आज सेन्सेक्स 151 अंकाच्या तेजीसह 59,354 वर सुरू झाला तर निफ्टी 48 अंकाच्या तेजीसह 17,612 वर सुरू झाला. आज आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने गुंतवणूकदारांचे शेअर बाजाराकडे लक्ष लागले.

विकली एक्सपायरीच्या दिवशी गुरुवारी शेअर बाजारात खरेदी-विक्रीचे वातावरण दिसून आले. एनर्जी, आयटी, मेटल शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. एफएमसीजी, फार्मा, इन्फ्रा शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सरकारी बँकांशी निगडीत शेअर्स वाढले आहेत. बँकिंग, रियल्टी, ऑटो शेअर्समध्ये विक्री दिसून आली.

सेन्सेक्स 95.71 अंकांच्या म्हणजेच 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 59,202.90 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 51.70 अंकांच्या किंवा 0.3 टक्क्यांच्या वाढीसह 17,563.95 वर बंद झाला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

युपीएल (UPL)
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
बीपीसीएल (BPCL)
एचसीएल टेक (HCLTECH)
एनटीपीसी (NTPC)
पेज इंडिया (PAGEIND)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
एमआरएफ (MRF)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
एल अँड टी सर्व्हिसेज लिमिटेड (LTTS)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT