Todays Share Market News sakal
अर्थविश्व

आठवडाभर शेअर बाजारात अस्थिरता, शेवटच्या दिवशीही पडझड कायम

आज शेअर बाजारात विक्रीचा जोर कायम राहील मात्र गुंतवणूकदारांना धाकधूक असेल.

सकाळ डिजिटल टीम

Todays Share Market News: आठवडाभर शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह दिसून आला. सेन्सेक्स 260 अंकाच्या घसरणीसह 52,750 वर सुरू झाला तर निफ्टी 93 अंकाच्या घसरणीसह 15,680 वर सुरू झाला. आज शेअर बाजारात विक्रीचा जोर कायम राहील मात्र गुंतवणूकदारांना धाकधूक असेल.

गुरुवारी बाजारात प्रचंड अस्थिरता होती. व्यवहाराच्या शेवटी बाजार सपाट बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 8.03 अंकांनी म्हणजेच 0.02 टक्क्यांनी घसरून 53,018.94 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 18.85 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 15,780.25 वर बंद झाला.

निफ्टी सध्या साईडवेज ट्रेडमध्ये असल्याचे LKP सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. यासाठी 15,700 वर सपोर्ट आणि 15,900 वर रझिस्टंस आहे. जर निफ्टीने वरच्या बाजूने 15,900 ची पातळी तोडली तर बाजारात शॉर्ट कव्हरिंग रॅली दिसू शकते आणि निफ्टी 16200 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, 15,700 चा सपोर्ट तुटला तर तो 15,500-15,400 च्या दिशेने जाताना दिसेल. याच रेंजमध्ये फ्रेस पुट रायटींग पाहायला मिळाली.

कमकुवत जागतिक संकेत आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी विक्री सुरू ठेवल्याने बाजाराचा कल कमजोर राहिला. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

ऍक्सिस बँक (AXISBANK)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
डिवीस लॅब (DIVISLAB)
ब्रिटानिया (BRITANNIA)
एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
आयशर मोटर्स (EICHERMOTORS)
सिप्ला (CIPLA)
बीपीसीएल (BPCL)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
श्रीराम सिमेंट (SHREECEM)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT