share market update google
अर्थविश्व

सेन्सेक्समध्ये 425 अंकाची तेजी, शेअर मार्केटमध्ये विक्रीचा जोर कायम

बँकिंग, आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून येण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Update: सलगच्या घसरणीला ब्रेक देत बुधवारी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे बाजारातील उत्साह वाढल्याचे दिसून आले. आजसुद्धा शेअर बाजार तेजीसह उघडला. सेन्सेक्स 425 अंकाच्या तेजीसह 54,175 वर सुरू झाला तर निफ्टी 132 अंकांच्या तेजीसह 16,120 वर सुरू झाला.

आज शेअर मार्केटमध्ये शेअर्स विक्रीवर जोर कायम राहील. बँकिंग, आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून येण्याची शक्यता आहे. (share market opening update 7 july 2022)

बुधवारी अर्थात विकली एक्सपायरीच्या दिवसांमध्ये बाजारात चांगले वातावरण दिसून येत आहे. बुधवारी निफ्टीमध्ये मोठी वाढ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 616.62 अंकांच्या म्हणजेच 1.16 टक्क्यांच्या वाढीसह 53,750.97 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 178.95 अंकांच्या म्हणजेच 1.13 टक्क्यांच्या वाढीसह 15,989.80 वर बंद झाला. मोठ्या शेअर्ससोबतच छोट्या-मध्यम शेअर्समध्येही खरेदी झाली.

निफ्टी बुधवारी 4आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. एफएमसीजी, ऑटो, रियल्टी शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. बँकिंग, आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली. पीएसई आणि एनर्जी शेअर्स मात्र दबावाखाली राहिले. गुरुवारी निफ्टीचे 50 पैकी 40 शेअर्स वाढले तर सेन्सेक्सचे 30 पैकी 25 शेअर्स वधारले. दुसरीकडे, निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये खरेदी दिसली.

शेअर बाजाराने इतर आशियाई बाजारांपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. प्रचंड अस्थिरता असतानाही, निफ्टीने बुधवारी पुन्हा एकदा 16000 ची पातळी ओलांडण्यात यश मिळवले. गेल्या काही सत्रांमध्ये मंदीची चिंता काहीशी कमी झाली आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीही नरमल्या आहेत. ज्याचा आज बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज फायनान्स (BAJFINANCE)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
ब्रिटानिया (BRITANNIA)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
ए यु बँक (AUBANK)
ट्रेंट (TRENT)
डिक्सन (DIXON)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT