Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market Latest Updates | Stock Market News  sakal
अर्थविश्व

सलग दुसऱ्याही दिवशी शेअर मार्केटमध्ये निचांक, Sensex 520 अंकानी घसरला

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या दुसऱ्याही दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसत आहे. सेन्सेक्स 520 अंकांनी घसरुन 55,153 वर उघडला आणि निफ्टी 152 अंकांनी घसरुन 16,417 वर उघडला त्यामुळे आज पुन्हा शेअर बाजारात विक्रीचा जोर पाहायला मिळेल.

आशियाई बाजारातून येणारे संमिश्र संकेत, कच्च्या तेलाच्या किमती आणि कोविड प्रकरणांमध्ये झालेली वाढ यामुळेही सोमवारीही दबाव दिसून आला होता. शेवटी सेन्सेक्स 93.91 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 55,675.32 वर बंद झाला होता तर दुसरीकडे, निफ्टी 14.75 अंकांनी म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून 16,569.55 वर बंद झाला होता.

सोमवारी बाजार मंदावला होता आणि मिश्र जागतिक संकेतांमुळे तो जवळजवळ सपाट बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि MPC बैठकीपूर्वी सावधगिरीचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. इंडेक्समध्ये पुढे कंसोलिडेशनचे संकेत दिसत आहेत.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज ऑटो (BAJAJAUTO)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

ओएनजीसी (ONGC)

अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

ए यू बँक (AUBANK)

टाटा पॉवर (TATAPOWER)

भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Racism : भारतीय क्रिकेट संघात होतोय वंशभेद..? वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! दिल्लीतील दोन सरकारी हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेल; सर्च ऑपरेशन सुरू

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

VIDEO: जोडपं KTM बाईकवर करत होतं 'रोमँटिक' स्टंट; पोलीस अधीक्षकांनी रंगेहात पकडलं; पाहा व्हिडिओ

IPL 2024 CSK vs RR Live Score : चेन्नईला तीन धक्के, राजस्थानचा कमबॅक करण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT