Today's Stock Market News | Share Market Updates Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार पुन्हा रूळावर; सेन्सेक्स 635, निफ्टी 169 अंकांनी वधारला; टाटा मोटर्स, सनफार्मा टॉपला

सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली. शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांमध्ये आजच्या दिवसाच्या सुरुवातीला मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी गॅप अप ओपनिंग दिलं. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 635.43 अंकांनी वधारून 53,565.74 वर सुरू झाला. तर निफ्टी 169 अंकांनी वधारून वर 15,977.00 सुरू झाला. निफ्टी 50 मधील टाटा मोटर्स (TATAMOTORS), सनफार्मा (SUNPHARMA), टाटा स्टील (TATASTEEL), अदानी पोर्ट्स (ADANIPORTS), आयशर मोटर्स (EICHERMOT) सह 45 शेअर्स वधारले तर एल अॅण्ड टी (LT), एनटीपीसी (NTPC), एसबीआय लाईफ (SBILIFE) टिसीएस (TCS), भारती एअरटेल (BHARTIARTL) सह 5 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. वाढती महागाई आणि विक्रीचा दबाव यामुळे बाजार सलग पाचव्या दिवशी लाल चिन्हात बंद झाला. शेवटी सेन्सेक्स 1,158 अंकांनी म्हणजेच 2.14 टक्क्यांनी घसरून 52,930.31 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 359.10 अंकांनी म्हणजेच 2.22 टक्क्यांनी घसरून 15,808 वर बंद झाला.

कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजार कमजोरीसह खुले झाल्याचे आनंद राठीचे नरेंद्र सोलंकी म्हणाले. अमेरिकेतील महागाईच्या वाढत्या आकडेवारीचा जागतिक बाजारावर परिणाम दिसून आला आहे. दिवसभर जसजसा व्यवहार पुढे सरकत गेला तसतशी बाजारातील कमजोरी वाढत गेली. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जूनच्या पॉलिसी मीटिंगमध्ये आरबीआयने दर आणखी वाढवल्याच्या बातम्यांमुळे बाजारातील व्यापारी सावध असल्याचे दिसून आले असेही सोलंकी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT