Share market pre analysis  Sakal
अर्थविश्व

Share Market: नव्या आर्थिक वर्षाची चांगली सुरुवात, कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?

भारतीय बाजाराने 2022-23 या आर्थिक वर्षाची सुरुवात अतिशय दमदार केली.

शिल्पा गुजर

Share Market: भारतीय बाजाराने 2022-23 या आर्थिक वर्षाची सुरुवात अतिशय दमदार केली. 1 एप्रिलला बँक, पॉवर, ऑइल अँड गॅस आणि रिअ‍ॅल्टी शेअर्सच्या चांगल्या कामगिरीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स इंट्राडेमध्ये 59,396.62 च्या पातळीवर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी, 708.18 अंकांच्या अर्थात 1.21 टक्क्यांच्या वाढीसह 59,276.69 वर बंद झाले. हाच निफ्टी इंट्राडेमध्ये 17,703 च्या पातळीवर पोहोचला आणि व्यवहाराच्या शेवटी 205.70 अंकांच्या अर्थात 1.18 टक्क्यांच्या वाढीसह 17,670.45 वर बंद झाला.

भारतीय शेअर बाजाराने या आठवड्यात पॉझिटीव्ह रिटर्न दिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. जागतिक स्तरावरही, इक्विटी बाजार या आठवड्यातही मोठ्या प्रमाणात मजबूत राहिले. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत प्रगतीच्या संकेतांमुळे बाजारात चांगले वातावारण आहे. कमोडिटीच्या किमती अलीकडच्या उच्चांकावरून काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. यामुळे भारतीय बाजारपेठेत तेजी आली आहे. (Share Market Pre Analysis, Best Stock to Buy)

या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. तेल आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांसाठी हे सकारात्मक लक्षण आहे. यापुढे बाजाराचे लक्ष वस्तूंच्या किमती, चलनवाढीची आकडेवारी आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणात्मक निर्णयांवर राहील असेही ते म्हणाले.

आज बाजाराची स्थिती कशी असेल?

1 एप्रिल रोजी निफ्टीने क्लोझिंग बेसिसवर 17500 चा मोठा अडथळ्याला ब्रेक केल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपाखी म्हणाले. इंडेक्सने या आठवड्यात आपला नफा कायम राखला आहे आणि विकली चार्टवर बुलिश आउट साइड बार तयार केल्याचे रत्नपाखी म्हणाले. डेली चार्टवर निफ्टीने बुलीश आऊट साइड बार तयार केला आहे आणि त्यासोबतच एंगल्फिंग बुलिश कॅन्डल देखील तयार केली आहे.

तर, डेली अपर बोलिंजर बँड वरच्या दिशेने जात आहे. यामुळे इंडेक्सचा वर जाण्याचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. या सर्व संकेतांमुळे निफ्टी लवकरच वरच्या बाजूने 18,000 ची पातळी गाठेल असे दिसते. तर खाली निफ्टीला 17500-17420 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

एनटीपीसी (NTPC)

बीपीसीएल (BPCL)

पॉवर ग्रीड (POWERGRID)

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

एचडीएफसी (HDFC)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

टाटा पॉवर (TATAPOWER)

आयआरसीटीसी (IRCTC)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT