Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड? कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

तब्बल 6 दिवसांच्या घसरणीसनंतर अखेर सोमवारी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

Best Stock to Buy: तब्बल 6 दिवसांच्या घसरणीसनंतर अखेर सोमवारी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला. आयटी आणि एफएमसीजी वगळता सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 180.22 अंकांच्या म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 52,973.84 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 60.15 अंकांच्याअर्थात 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 15,842.30 वर बंद झाला.

सोमवारी व्यवहारात बाजाराला ऑटो आणि बँक शेअर्सचा पाठिंबा मिळाला. मात्र, वाढत्या महागाईची भीती आणि त्याचा ग्राहकांवर होणारा परिणाम याचा बाजारावर मोठा परिणाम दिसला. पहिल्या तिमाहीत आणि चालू आर्थिक वर्षाचे चांगले निकाल येण्याची शक्यता असलेल्या अशा कंपन्यांकडे बाजारपेठेची नजर आहे. वाढत्या स्पर्धेमुळे डायग्नोस्टिक आणि पॅथॉलॉजी स्टॉकमध्ये चौथ्या तिमाहीच्या निकालापूर्वी नफा-वसुली झाली.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी आता काही स्वरुपात मजबूत होताना दिसत असल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग आधारावर 15,800-16000 च्या छोट्या श्रेणीत फिरत आहे तोपर्यंत तो साइडवेज राहणे अपेक्षित आहे. या रेंजच्या दोन्ही बाजूंनी पक्के ब्रेकआउट दिसले तरच बाजाराची दिशा स्पष्ट होईल.

नकारात्मक बातम्यांमुळे गुंतवणूकदार इक्विटी मार्केटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याच्या उपायांचा अवलंब केल्याने पुढील वाढ खुंटली जाण्याची भीती बाजारात आहे. त्यामुळे बाजारात आणखी करेक्शन येऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

आयशर मोटर्स (EICHERMOT)

अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

युपीएल (UPL)

एनटीपीसी (NTPC)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

बालक्रिश्न इंडस्ट्रीज (BALKRISIND)

भारत फोर्ज (BHARATFORG)

भारत इलेक्ट्रीकल लिमिचटेड (BEL)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT