Share Market Latest Updates | Stock Market News Sakal
अर्थविश्व

शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी एक नजर टाका आज परफॉर्म करणाऱ्या 10 शेअर्सवर

अनेक मोठ्या विकसित अर्थव्यवस्थांच्या मध्यवर्ती बँका चलनवाढीला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढवताना दिसू शकतात

शिल्पा गुजर

मंगळवारीही शेअर बाजार घसरणीसह अर्थात लाल चिन्हात बंद झाला. संमिश्र जागतिक संकेतांमुळे एफएमसीजी आणि बँक वगळता सर्व सेक्टर्समध्ये विक्री दिसून आली. शेवटी, सेन्सेक्स 105.82 अंकांनी अर्थात 0.19 टक्क्यांनी घसरून 54,364.85 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 61.80 अंकांनी अर्थात 0.38 टक्क्यांनी घसरून 16,240.05 वर बंद झाला.

सेंट्रल बँकेने चलन विनिमय करूनही, कमजोर झालेल्या रुपयामुळे आयटी स्टॉकवर दबाव होता असे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन यांचे म्हणाले. पण, एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मेटल स्टॉकमध्ये मोठी घसरण दिसून आली. मेटल इंडेक्स 5 टक्क्यांहून अधिक घसरला.

आज कशी असेल शेअर बाजारातील स्थिती ?

जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये मंदी येण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांनी मेटल, पॉवर, ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचे दिसून आले असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण झाली. अनेक मोठ्या विकसित अर्थव्यवस्थांच्या मध्यवर्ती बँका चलनवाढीला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढवताना दिसू शकतात, ज्यामुळे अर्थव्यवस्थेची वाढ मंदावेल यासाठी व्यापारी चिंतित आहेत. याचा थेट परिणाम भारताला होणार आहे.

टेक्निकली विचार केल्यास निफ्टीने आज इंट्राडे रिकव्हरी पाहिली, पण त्याला पुन्हा एकदा 16,400 च्या वर रझिस्टंसचा सामना करावा लागला आणि इथून झपाट्याने घसरण झाली. इंट्राडे चार्टवर इंडेक्स अजूनही लोअर टॉप फॉर्मेशन होल्ड करत आहे. जे बाजारासाठी चांगले नाही. व्यापार्‍यांसाठी 16,200 पातळी खूप महत्त्वाची आहे. जर ही पातळी खाली गेली तर निफ्टी 16,100-16,050 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, निफ्टी 16300 च्या वर गेल्यास नवीन पुलबॅक रॅलीची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत निफ्टी 16,400-16,450 च्या दिशेने जाताना दिसू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिंदूस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

एशियन पेंट्स (ASIANPAINT)

इंडसइंड बँक (INDUSINDBK)

अल्ट्रा टेक सिमेंट (ULTRACEMCO)

आयशर मोटर्स (EICHERMOT)

व्होल्टास (VOLTAS)

पेज इंडिया (PAGEIND)

ट्रेंट (TRENT)

डिक्सन (DIXON)

टाटा पॉवर (TATAPOWER)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT