share market sakal media
अर्थविश्व

Share Market: आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड, या 10 शेअर्सवर करा फोकस

काल विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजार काहीशा घसरणीसह बंद झाला.

शिल्पा गुजर

गुरुवारी विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजार काहीशा घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 89.14 अंकांनी अर्थात 0.14 टक्क्यांनी घसरून 57,595.68 वर बंद झाला, जवळजवळ सर्व इंट्राडे नफा गमावून. दुसरीकडे, निफ्टी 23 अंकांनी अर्थात 0.13 टक्क्यांनी घसरून 17,223 वर बंद झाला. आयटी, फार्मा, मेटल आणि ऑइल अँड गॅसमध्ये खरेदी दिसून आली. बँकिंग शेअर्सवर दबाव दिसून आला.

गुरुवारी दिवसाचा काही भाग बाजार नकारात्मक क्षेत्रात राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. पण व्यवहाराच्या शेवटी ही घसरण कमी झाल्याचे दिसून आले. युरोपियन बाजारांची चांगली सुरुवात झाल्यामुळे बाजाराला थोडा सपोर्ट मिळाला.

येत्या काळात निफ्टी एका टप्प्यात व्यापार करताना दिसेल असे बाजाराची इंट्राडे फॉर्मेशन सूचित करते. वरच्या बाजूला, निफ्टीसाठी पहिला रझिस्टंस 17,325 वर दिसत आहे. इथून निफ्टीमध्ये काही कमजोरी असल्यास तो 17,100-17,060 वर जाताना दिसतो. दुसरीकडे, जर निफ्टीने 17,325 ची पातळी ओलांडली तर यामध्ये 17,375-17,425 ची पातळी पाहू शकतो. कॉन्ट्रा ट्रेडर्स 17,060 च्या जवळ लांब पोझिशन्स घेऊ शकतात पण 17030 चा स्टॉप लॉस ठेवला पाहिजे असेही ते म्हणाले.

निफ्टी 17,300 च्या रझिस्टंस झोनच्या खाली बंद झाल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. जर निफ्टी 17,300 च्या खाली राहिला, तर ही घसरण 17000-16,800 पर्यंत वाढू शकते, जी निफ्टीसाठी सपोर्ट झोन म्हणून दिसत आहे.

आज कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?

डॉ. रेड्डी (DRREDDY)

कोल इंडिया (COALINDIA )

अल्ट्रा टेक सिमेंट (ULTRACEMCO)

हिंदाल्को (HINDALCO)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

टाटा पॉवर (TATAPOWER)

भारत फोर्ज (BHARATFORG)

पेट्रोनेट (PETRONET)

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Export Tax: मोठी बातमी! डिझेल आणि हवाई इंधन निर्यातीवर करात दुप्पट वाढ; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, जाणून घ्या नवे दर...

Sanju Samson : सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात, प्लीज प्रत्येक मॅचला या...! विक्रमी शतकानंतर संजूने कोणाला केली विनंती? भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव...

IAS Sandeep Rathod News: तुळशीचे भूमिपुत्र आयएएस संदीप राठोड केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवपदी नियुक्त; माहूर तालुक्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Chh. Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर स्विफ्ट कारची ट्रॅक्टरला भीषण धडक; महिलेचा हात फ्रॅक्चर, एक जखमी

Narendra Modi Ambulance Video : बंगालमध्ये रोड शोदरम्यान पंतप्रधान मोदींनी थांबवला ताफा; रुग्णवाहिकेला दिला मार्ग, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT