Share Market sakal
अर्थविश्व

Share Market: आज शेअर बाजारात काय असेल स्थिती? या10 शेअर्सवर ठेवा लक्ष

काल ऑटो, ऑईल अँड गॅस, आयटी, फार्माशिवाय एचडीएफसी आणि रिलायन्सच्या शेअर्सचे मोठे योगदान राहिले.

शिल्पा गुजर

Share Market Updates: बुधवारी भारतीय शेअर बाजाराच्या मागच्या 5 दिवसांच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला. या तेजीत ऑटो, ऑईल अँड गॅस, आयटी, फार्माशिवाय एचडीएफसी आणि रिलायन्सच्या शेअर्सचे मोठे योगदान राहिले. दिवसाअंती सेन्सेक्स 574.35 अंकांच्या अर्थात 1.02 टक्क्यांच्या वाढीसह 57,037.50 वर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टी 177.80 अंकाच्या अर्थात 1.05 टक्क्यांच्या वाढीसह 17,136.50 बंद झाला.

आतापर्यंत सपाटून मार खाल्लेल्या एचडीएफसी आणि आयटी सेक्टरच्या शेअर्समधील रिकव्हरीच्या जोरावर बाजारात तेजी दिसून आल्याचे जियोजित फायनान्शियल्सचे विनोद नायर यांचे म्हणणे आहे. एकीकडे विदेशी गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात विक्री करत असले तरी देशांतर्गत गुंतवणुकदारांकडून सुरु असलेल्या खरेदीमुळे बाजाराने समतोल राखला.

आज काय असेल शेअर बाजाराची स्थिती ?

निफ्टीमध्ये बुधवारी डेली लोअर बॉलिंजर बँडपासून बाऊंस बॅक बघायला मिळाल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. डेली चार्टवर निफ्टीने एक इनसाईड बार पॅटर्न तयार केला आहे. या पॅटर्नमधील वरील आणि खालील स्तर अर्थात 16,824 - 17,275 हा निफ्टीसाठी सपोर्ट आणि रझिस्टंसचे काम करेल. शॉर्ट टर्मचा विचार केल्यास 17,275 - 17,300 निफ्टीसाठी मोठा अडथळा दिसून येत आहे. जोपर्यंत निफ्टी या लेव्हलच्या खाली असेपर्यंत हा साईडवेज राहण्याची शक्यता आहे. पण जर निफ्टीने हा अडथळा तोडून वर जाण्याचा प्रयत्न केला तर यात तेजी दिसू शकते असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

भारत पेट्रोलियम (BPCL)

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

श्री सिमेंट (SHREECEM)

आयशर मोटर्स (EISHERMOTORS)

मारुती (MARUTI)

ऍस्ट्रल (ASTRAL)

अशोक लेलँड (ASHOKLELY)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

एमआरएफ (MRF)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले,महिलेचा जागीच मृत्यू

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT