Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

शुक्रवारी शेअर बाजाराने दिवसभरातील सर्व नफा गमावल्यानंतर शेवटी लाल चिन्हावर अर्थात घसरणीसह बंद झाला.

शिल्पा गुजर

Share Market: शुक्रवारी शेअर बाजाराने दिवसभरातील सर्व नफा गमावल्यानंतर शेवटी लाल चिन्हावर अर्थात घसरणीसह बंद झाला. शेवटी सेन्सेक्स 48.88 अंकांनी म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून 55,769.23 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 43.70 अंक म्हणजेच 0.26 टक्क्यांनी घसरून 16,584.30 वर बंद झाला.

सेंट्रल बँकेची पॉलिसी आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या भीतीचे बाजारावर वर्चस्व दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. त्यातच गुंतवणूकदारांची नजर यूएस नोकऱ्यांच्या डेटावर आहे. आरबीआय आपले दर 25 बेसिस पॉईंट्सने 35 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढवेल अशी शक्यता असल्याचे ते म्हणाले. त्याच वेळी, यूएस फेड आपले दर 50 बेस पॉइंट्सने वाढवू शकते. आता पुढील आऊटलूक आणि इकोनॉमिक ग्रोथ आणि महागाईची आकडेवारी बाजाराची दिशा ठरवेल. केंद्रीय बँकांनी त्यांची आर्थिक धोरणे कडक करण्याचे संकेत दिल्यास बाजारातील मूड मंदीचा होऊ शकतो.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
3 जून रोजी अर्थात शुक्रवारी सेन्सेक्स 56119 च्या पातळीवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स 2.24 टक्क्यांनी वाढला आहे. तर शुक्रवारी निफ्टी 16,931 च्या पातळीवर बंद झाला आहे आणि या आठवड्यात तो 1.95 टक्क्यांनी वाढला आहे. महागाई वाढण्याची आणि व्याजदरात वाढ होण्याची भीती याचा बाजारावर दबाव असल्याचे झाल्याचे कोटक सिक्युरिटीचे श्रीकांत चौहान म्हणाले. या आठवड्यात सर्व देशांच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांचे व्याजदर वाढवलेत, ज्याचा परिणाम बाजारावर होत असल्याचेही ते म्हणाले.

बाजारात सध्या वाढती महागाई, व्याजदरातील वाढीमुळे बाजारात चिंतेचे वातावरण असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. अशा परिस्थितीत बाजारातील कोणत्याही तेजीवर नफा बुकिंग (Profit Booking) करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

रिलायन्स (RELIANCE)
इन्फोसिस (INFY)
एल अँड टी (LT)
सनफार्मा (SUNPHARMA)
एचसीएल टेक (HCLTECH)
ट्रेंट (TRENT)
एमआरएफ (MRF)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT