Share Market Returns esakal
अर्थविश्व

Share Market Returns : केवळ 9 महिन्यात 236% रिटर्न, 'या' शेअरमध्ये आणखी तेजीचा विश्वास

गेल्या 9 महिन्यांत त्यात 236 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनी मार्केट कॅप 1,344.74 कोटी रुपये आहे

सकाळ डिजिटल टीम

Share Market Returns : एअरोस्पेस आणि संरक्षण कंपनी रॉसेल इंडियाच्या (Rossell India) शेअर्समध्ये गेल्या काही काळापासून चांगली खरेदी दिसून येत आहे. गुरुवारीही या शेअर्सने इंट्रा-डेमध्ये 16 टक्क्यांच्या वाढीसह विक्रमी उच्चांक गाठत 379.70 रुपयांवर गेला जो त्याचा ऑल टाईम हाय आहे. गेल्या 9 महिन्यांत त्यात 236 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनी मार्केट कॅप 1,344.74 कोटी रुपये आहे.

का होतेय वाढ ?

रोसेल इंडियाच्या बोर्डाने 14 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीच्या डिमर्जरला मान्यता दिली. सध्या, रॉसेल इंडियामध्ये रॉसेल टी आणि रॉसेल टेकसस अशी दोन युनिट्स आहेत. आता नवीन योजनेनुसार रॉसेल टेकसस ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाईल. या घोषणेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबर रोजी रॉसेल इंडियाच्या शेअर्सने 361.55 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. यावर्षी 24 फेब्रुवारी 2022 रोजी त्याची किंमत 112.95 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर, सुमारे नऊ महिन्यांत, तो आज 379.70 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर 236 टक्क्यांनी वाढला.

कंपनी काय करते ?

रॉसेल इंडिया ही एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील कंपनी आहे. याशिवाय ही कंपनी चहा विकते. कंपनी यूएस, यूके, जपान, इराण आणि यूएई सारख्या देशांमध्ये चहाची निर्यात करते. त्याचे एअरोस्पेस आणि संरक्षण विभाग, रॉसेल टेकसस, जगभरातील कंपन्यांना वायर हार्नेस सोल्यूशन्स, इलेक्ट्रॉनिक सिस्टम, टेस्ट सॉल्यूशंस आणि प्रॉडक्ट सपोर्ट बजेटमध्ये देते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT