share market sakal media
अर्थविश्व

मुंबई : निर्देशांकांची दुसरी घसरण सेन्सेक्स 254 अंश घसरला

सेन्सेक्स 254.33 अंश तर निफ्टी 37.30 अंशांनी कोलमडला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जागतिक शेअरबाजारांमधील नकारात्मक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी गडगडले. सेन्सेक्स 254.33 अंश तर निफ्टी 37.30 अंशांनी कोलमडला.

आज औषध, धातूनिर्मिती, रिअल्टी, उर्जा क्षेत्रातल्या शेअरचे भाव वाढले तर वाहनउद्योग, बँका, एफएमसीजी क्षेत्राच्या शेअर मध्ये नफावसुली झाली. दिवसअखेरीस सेन्सेक्स 59,413.27 अंशांवर तर निफ्टी 17,711.30 अंशांवर स्थिरावला.

आज सेन्सेक्स साठ हजारांचा टप्पा गाठू शकला नाही, त्याला फक्त 59,678.66 अंशांपर्यंतच जाता आले. मात्र सेन्सेक्स खालच्या दिशेने 59.111.41 अंशांपर्यंत गेल्यावर त्या पातळीवर खरेदी सुरु झाल्याने तो 59 हजारांच्या खाली घसरला नाही. आज युरोप व आशियायी शेअर बाजारांमध्ये सुरुवातीला घसरण झाल्याने भारतीय शेअरबाजारही नरमगरम होते. पण नंतर सर्वच शेअरबाजार थोड्या प्रमाणात सावरले.

आज एचडीएफसी 57 रुपयांनी घसरून 2,746 रुपयांवर आला. अल्ट्राटेक सिमेंटचा भाव 120 रुपयांनी कमी झाला व तो 7,466 रुपयांवर स्थिरावला. कोटक बँक (2,030), एशियन पेंट (3,322), हिंदुस्थान युनिलीव्हर (2,684), एचडीएफसी बँक (1,593) यांच्यासह टेक महिंद्र, आयसीआयसीआय बँक, अॅक्सीस बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज (2,527) यांचेही भाव घसरले. तर दुसरीकडे सन फार्मा 31 रुपयांनी वाढून 811 रुपयांवर गेला. स्टेट बँक (बंद भाव 460 रु.), टाटा स्टील (1,295), डॉ. रेड्डीज लॅब (4,881), एचसीएल टेक, महिंद्र आणि महिंद्र, टीसीएस, इन्फोसिस, आयटीसी यांचे भाव वाढले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 46,100 रु.

चांदी - 60,450 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT