share market
share market esakal
अर्थविश्व

मंगळवारी शेअर बाजारात घसरण, आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

शिल्पा गुजर

सेन्सेक्स आणि निफ्टी लाल मार्कवर अर्थात घसरणीसह बंद झाले.

कमजोर जागतिक संकेत आणि दोन दिवसांच्या तेजीनंतर, आज बाजारात नफा वसुली दिसली. सेन्सेक्स आणि निफ्टी लाल मार्कवर अर्थात घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स मंगळवारी 112.16 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 60,433.45 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 24.20 अंकांच्या अर्थात 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 18,044.30 वर बंद झाला.

चांगल्या सुरुवातीनंतर मंगळवारी देशांतर्गत बाजारात दबाव दिसून आल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बँकिंग शेअर्स घसरले. मात्र, ऑटो, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. एवढेच नाही तर दिग्गज शेअर्सच्या तुलनेत लहान आणि मध्यम शेअर्सने चांगली कामगिरी केली.

बहुप्रतिक्षित पायाभूत सुविधा विधेयक अर्थात इंफ्रास्ट्रक्चर बिल मंजूर होऊनही, यूएस बाजार सावधगिरीने व्यवहार करत असल्याचे दिसून आले. याचे कारण म्हणजे इथे सगळ्यांच्या नजरा अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीवर आहेत असेही नायर म्हणाले.

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने डेली स्केलवर एक बियारिश कँडल तयार केली ज्याचा अर्थ मंदी आहे असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया सांगत आहेत. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांपासून निफ्टी उच्चांकी पातळीवर आहे. आता निफ्टीला 18150 आणि 18350 च्या झोनमध्ये जाण्यासाठी 18000 च्या वरच राहावे लागेल. खाली निफ्टीला 17,850-17,777 स्तरांवर चांगला सपोर्ट आहे.

निफ्टी मंगळवारी 18,000 च्या वर बंद झाला आहे. हे एक चांगले लक्षण असल्याचे दीनदयाल इन्व्हेस्टमेंटचे मनीष हथिरामानी म्हणतात. मात्र, त्याची दिशा अद्याप स्पष्ट नसून उच्च स्तरावर त्याला अडचणी आहेत. जर निफ्टी या स्तरांवर राहिला तर तो आपल्याला 18,400-18,600 च्या दिशेने जाताना दिसेल. 17,600 वर निफ्टीला चांगला सपोर्ट असल्याचे मनीष हथिरामानी म्हणाले.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- महिंद्रा अँड महिंद्रा (M & M)

- टाटा मोटर्स (TATA MOTORS)

- हिरो मोटो कॉर्प ( HEROMOTOCO)

- भारतीय स्टेट बँक (SBIN)

- ओएनजीसी (ONGC)

- आयडिया (IDEA)

- एस्कॉर्टस (ESCORTS)

- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)

- टाटा पॉवर (TATA POWER)

- गुजरात गॅस (GUJGASLTD)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT