Share Market  google
अर्थविश्व

Share Market : या पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, तुमच्याकडे आहे का ?

शिवाय ही फर्म टर्नकी टेलिकम्युनिकेशन प्रोजेक्ट्स, पॉवर ट्रान्समिशनची स्थापना, सबस्टेशन्स आणि टेलिकॉम उत्पादने इत्यादीसारख्या अनेक लेव्हलवर काम करते.

नमिता धुरी

मुंबई : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. अनेक स्मॉल कॅप किंवा पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. अशात अद्वैत इन्फ्राटेक लिमिटेड (Advait Infratech Ltd) हा या वर्षातील टॉप मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक आहे. याने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 1113% चा परतावा दिला आहे.

अद्वैत इन्फ्राटेक लिमिटेड (Advait Infratech Ltd) ही स्मॉल-कॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप 317.73 कोटी आहे. ही फर्म औद्योगिक व्यवसायात आहे. शिवाय ही फर्म टर्नकी टेलिकम्युनिकेशन प्रोजेक्ट्स, पॉवर ट्रान्समिशनची स्थापना, सबस्टेशन्स आणि टेलिकॉम उत्पादने इत्यादीसारख्या अनेक लेव्हलवर काम करते.

ओपीजीडब्ल्यू (ऑप्टिकल फायबर ग्राउंड वायर), ओएफसी केबल, एसीएस (ऍल्युमिनियम क्लॅड स्टील वायर), ईआरएस (इमर्जन्सी रिस्टोरेशन सिस्टीम) आणि ओपीजीडब्ल्यू जॉइंट बॉक्सचे उत्पादन सुरू करून याने आपला व्यवसाय आणखी वाढवला.

अद्वैत इन्फ्राटेक लिमिटेडचे शेअर्स 16 डिसेंबर 2022 रोजी 623 रुपयांवर बंद झाले होते. हा स्टॉक 28 सप्टेंबर 2020 रोजी बीएसईवर लिस्ट झाला होता. त्याच्या आयपीओपासून, गेल्या 2 वर्षात आतापर्यंत स्टॉक 1,113.24 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या 1 वर्षात या शेअरने 669.14% मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. शेअरची किंमत 20 डिसेंबर 2021 रोजी 81 रुपयांपासून आता 623 रुपयांपर्यंत वाढली आहे. या वर्षी आतापर्यंत या शेअरमध्ये 419.17 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

गेल्या 6 महिन्यांत, स्टॉकने 231.38 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. दुसरीकडे, गेल्या एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर हा शेअर 7.01 टक्क्यांनी घसरला आहे. 15 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉकने 720 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 24 डिसेंबर 2021 रोजी हा शेअर 75 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT