pharma Stock sakal
अर्थविश्व

Pharma Stock: या स्टॉकमध्ये 4 महिन्यांत 90% वाढ, आणखी तेजीची शक्यता

गेल्या 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये हा स्टॉक 17 टक्क्यांनी वाढला आहे, तर गेल्या 4 महिन्यांत हा स्टॉक सुमारे 90 टक्क्यांनी वाढला.

सकाळ डिजिटल टीम

युनिकेम लॅबोरेटरीजचे (Unichem Laboratories) शेअर्स सध्या चांगलेच तेजीत दिसत आहेत. गुरुवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये, हा स्टॉक 5 टक्के वाढत 452.95 रुपयांचा नवीन उच्चांक बनवताना दिसला. गेल्या 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये हा स्टॉक 17 टक्क्यांनी वाढला आहे, तर गेल्या 4 महिन्यांत हा स्टॉक सुमारे 90 टक्क्यांनी वाढला.

गेल्या एका वर्षात, युनिकेम लॅबोरेटरीजच्या (Unichem Laboratories) शेअरने सुमारे 102 टक्के वाढ नोंदवली आहे, तर याच कालावधीत बीएसई सेन्सेक्स केवळ 2 टक्के वाढला आहे. युनिकेम लॅबोरेटरीज भारतासह जगातील सर्व देशांमध्ये आपली औषधे विकते.

कंपनीला गेल्या 3 महिन्यांत US FDA कडून 4 औषधांसाठी ANDA मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे याचा फायदा कपनीला येत्या काळात मिळू शकतो. आता या शेअरमध्ये पैसे गुंतवण्याची योग्य संधी असल्याचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ देत आहेत.

प्रॉडक्ट फायलिंग मंजुरीच्या दृष्टिकोनातून कंपनीच्या पुढील वाढीची शक्यता खूप चांगली दिसत असल्याचे युनिकेम लॅबोरेटरीजने म्हटले आहे. कोरोना महामारीनंतर, AQ थेरपी सेगमेंटमध्ये पूर्वीसारखी वाढ होण्याची शक्यता नाही, तरीही लाईफ स्टाईल, आणि इतर आजारांमुळे क्रोनिक औषधांची मागणी मजबूत राहण्याची शक्यता आहे. ज्याचा फायदा कंपनीला मिळू शकतो असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rate Cut: डिसेंबरमध्ये तुमचा EMI कमी होणार? आरबीआय गव्हर्नर मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Medical Academy : वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या ॲकॅडमीचा पैसे देण्यास टाळाटाळ, विद्यार्थी गेला ग्राहक न्यायालयात अन् १३ लाख रूपये देण्यास पाडलं भाग...

Latest Marathi News Live Update : मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये २५ तृतीयपंथियांनी विष घेतले

Karnataka Education : दहावी, बारावी उत्तीर्णतेसाठी आता 33 टक्के गुणांची मर्यादा; राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल, कधीपासून नियम लागू होणार?

Thar Accident : भरधाव थारची सख्ख्या बहिणींना धडक; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT