Share Market  Sakal
अर्थविश्व

Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

मंगळवारच्या व्यवहारात एफएमसीजी आणि ऑटो शेअर्समध्ये विक्री दिसून आली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Tips : मंगळवारी बाजारात अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स 221 अंकांनी घसरून 60286 वर बंद झाला, तर निफ्टी 43 अंकांनी घसरून 17722 वर बंद झाला.

मंगळवारच्या व्यवहारात एफएमसीजी आणि ऑटो शेअर्समध्ये विक्री दिसून आली. त्याचबरोबर एनर्जी, मेटल आणि आयटी शेअर्सवर दबाव दिसून आला.

रिअल्टी, बँकिंग आणि फार्मा शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. निफ्टी बँक 116 अंकांनी वाढून 41491 वर बंद झाला, तर मिडकॅप 7 अंकांनी घसरून 30664 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टी इंडेक्स आरबीआयच्या धोरणाआधी एका मोठ्या रेंजमध्ये ट्रेड करत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले.

यासाठी 41000 वर सपोर्ट आणि 42000 वर रेझिस्टन्स दिसत आहे. कोणत्याही दिशेने मूव्ह दाखवण्यासाठी या रेंजमधून बाहेर पडावे लागेल. बाजाराचा अंडरटोन अजूनही मंदीचाच असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

निफ्टीमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. सलग दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्येही लोअर टॉप बनताना दिसला.

हे ट्रेडिंग सत्रात हाय व्होलॅटिलिटीचे संकेत आहे. आता येत्या काळात, निफ्टी 17870 - 17854 च्या छोट्या रेंजमध्ये फिरताना दिसेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • आयटीसी (ITC)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • मारुती (MARUTI)

  • डिक्सन (DIXON)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • ज्युबिलंट फुड्स (JUBLFOOD)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • ट्रेंड (TRENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT