Share Market Updates sakal
अर्थविश्व

सलग तीन दिवसापासून शेअर बाजारात घसरण

आज या घसरणीला ब्रेक लागला असून सेन्सेक्स 78 अंकांच्या तेजीसह 55,185 वर तर निफ्टी 28 अंकांच्या तेजीसह 16,444 वर उघडला.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसापासून शेअर बाजारात घसरण सुरु आहे. आज या घसरणीला ब्रेक करत सेन्सेक्स 78 अंकांच्या तेजीसह 55,185 वर तर निफ्टी 28 अंकांच्या तेजीसह 16,444 वर उघडला होता मात्र आता पुन्हा काही क्षणातच शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून येत आहे.

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची भीती बाजारावर कायम होती. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 567.98 अंकांनी म्हणजेच 1.02 टक्क्यांनी घसरून 55,107.34 वर बंद झाला होता. तोच निफ्टी 153.20 अंकांनी म्हणजेच 0.92 टक्क्यांनी घसरून 16416.35 वर बंद झाला होता.

व्याजदरात वाढ होण्याच्या चिंतेने मंगळवारी आशियाई बाजार संमिश्र होते असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. यूएस चलनवाढीच्या आकडेवारी येण्याआधी, व्याजदरात वाढ होण्याची चिंता वाढली आहे. या आठवड्यात युरोपियन सेंट्रल बँकेची बैठकही होणार आहे. दुसरीकडे, कच्चे तेल 120 डॉलरच्या वर आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात, सीपीआय चलनवाढीसह, बाजार अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीवरही लक्ष असेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

टाटा पॉवर (TATAPOWER)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

ओएनजीसी (ONGC)

एनटीपीसी लिमिटेड (NTPC)

कोल इंडिया (COALINDIA)

मारुी (MARUTI)

हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT