Todays Share Market Updates | Stock Market news Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार सकारात्मक! सेन्सेक्स 222 तर निफ्टी 58 अंकांच्या वाढीसह सुरु

तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market: गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने आज सकारात्मक ओपनिंग दिलं. शेअर बाजार आज हिरव्या चिन्हासह सुरु झाला. निफ्टी दोन्ही निर्देशांक किंचित वाढीसह सुरु झाले. सेन्सेक्स 222.02 अंकांच्या वाढीसह 59,256.97वर सुरु झाला, तर निफ्टी 58.6 अंकांच्या वाढीसह 17,698.15वर सुरु झाला. (Share Market Updates: positive opening in sensex and nifty today)

तत्पूर्वी गुरुवारी भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी लाल चिन्हाने अर्थात घसरणीसह बंद झाला. फार्मा वगळता जवळपास सर्वच सेक्टर्समधील विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 575.46 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी घसरून 59,034.95 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 168.10 अंकांनी किंवा 0.94 टक्क्यांनी घसरून 17640 च्या पातळीवर बंद झाला.

आरबीआयच्या धोरणाच्या एक दिवस आधी बाजारात अस्थिरता वाढत असल्याचे दिसून आल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. मेटल, पॉवरसह ऑईल अँड गॅससारख्या शेअर्सना जास्त फटका बसला आहे. मिड आणि स्मॉलकॅपलाही फटका बसला आहे. आरबीआयच्या घोषणा बाजाराची जी अपेक्षा आहे(म्हणजे, जर दर बदलले नाहीत आणि चलनवाढीचा अंदाज किरकोळ जास्त राहिला आणि मजबूत आर्थिक दृष्टीकोन असेल तर) तर बाजारामध्ये सकारात्मक कल दिसून येईल असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: फक्त १ धावेने सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलला BCCI ने सुनावली शिक्षा; DC vs GT सामन्यात काय झाली चूक?

प्रेयसीला गुजरातहून आणून कुऱ्हाडीने हत्या, तिच्या लेकराला भुश्श्याच्या ढिगात टाकून पेटवलं; प्रियकरही विवाहित

Baramati By-Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला, हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

IAS Anurag Yadav: तुम्ही असं बोलू शकत नाही... मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांशी भिडला आयएएस अधिकारी, कोण आहेत अनुराग यादव?

'हा' आहे जगात सगळ्यात जास्त विकला जाणारा मोबाईल; जाणून Samsung अन् Vivo ला आश्चर्याचा धक्का, भारतात किंमत एवढीशी की...

SCROLL FOR NEXT