Today's Stock Market News | Share Market Updates Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार तेजीसह सुरु; सेन्सेक्स 296 तर निफ्टी अंकांनी वधारला

आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाही शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates : शेअर बाजारामध्ये काल मंथली एक्सपायरीदिवशी तेजी दिसून आली होती. आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाही शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आज हिरव्या चिन्हात सुरु झाले. आज सेन्सेक्स (Sensex) 296.45 अंकांनी वधारून 57,817.51वर सुरु झाला तर निफ्टी (Nifty) 84.2 अंकांनी वधारून 17,329.25 वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील 39 शेअर्सने सकारात्मक ओपनिंग दिलं तर 11 शेअर्समध्ये दिवसाची सुरुवात घसरणीने झाली. ONGC, SUNPHARMA, TATASTEEL, GRASIM मध्ये चांगली वाढ झाली तर SBILIFE, AXISBANK, HEROMOTOCO, DIVISLAB मध्ये घट नोंदवली गेली.

गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी 1% पेक्षा जास्त वाढीसह बंद झाले, गुरुवारी बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत होते. एफएमसीजी, पॉवर, पीएसईच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. आयटी, इन्फ्रा, बँकिंग शेअर्समध्येही खरेदी झाली.

गुरुवारच्या व्यवसायात बाजाराची सुरुवात हिरव्या चिन्हात झाली. दिवस जसजसा पुढे जात होता, तसतसा बाजार तेजीत दिसत होता आणि व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाला.

बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत होते तेजीत होते. एफएमसीजी, पॉवर, पीएसई समभाग सर्वाधिक वाढले. आयटी, इन्फ्रा, बँकिंग शेअर्समध्येही खरेदी झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.31 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला तर स्मॉलकॅप इंडेक्स 0.08 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 701.67 अंकांच्या म्हणजेच 1.23 टक्क्यांच्या वाढीसह 57,521.06 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 206.65 अंकांच्या अर्थात1.21 टक्क्यांच्या वाढीसह 17245.05 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

SCROLL FOR NEXT