LIC Shares Sakal
अर्थविश्व

LICचे शेअर 800 रुपयांच्या खाली जातील? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

एमके ग्लोबलने गुंतवणूकदारांना एलआयसीचे शेअर्स 'होल्ड' करण्याचा सल्ला दिला आहे.

शिल्पा गुजर

LIC Shares: एलआयसीच्या शेअर्समधील घसरणीला काही ब्रेक लागत नाही, शुक्रवारीही या शेअरमध्ये घसरण दिसून आली. आता हा शेअर 803.70 रुपयांवर आला होता. हा स्टॉक बीएसई आणि एनएसईवर 17 मे रोजी लिस्ट झाला होता. तेव्हापासून हा शेअर सातत्याने घसरतोय. यामुळे एलआयसीच्या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता याच्या गुंतवणुकदारांना हा शेअर 800 रुपयांच्या खाली जाईल का असा प्रश्न सतावत आहे.

एमके ग्लोबलने गुंतवणूकदारांना एलआयसीचे शेअर्स 'होल्ड' करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 875 रुपयांचे टारगेट त्यांनी दिले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना पुढील काही महिन्यांत प्रॉफिट बुकींग करण्याची संधी मिळणार नाही. कारण एलआयसीच्या पॉलिसीधारकांना 889 रुपये किमतीत वाटप करण्यात आला होता. रिटेल गुंतवणूकदारांना 904 रुपयांमध्ये देण्यात आला होता.

LIC चा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO होता. सुमारे 17 तज्ज्ञांनी या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचे सुचवले होते. एलआयसीच्या शेअर्सची कामगिरी चांगली होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली होती. पण तरीही येत्या काही काळात LIC चे शेअर्स चांगली कामगिरी करतील असा विश्वास तज्ज्ञ आताही व्यक्त करत आहेत.

जवळपास 60 टक्के मार्केट शेअर असलेल्या एलआयसीला अनेक ऑपरेटिंग आव्हानांचा सामना करावा लागतो. सिंगल-प्रिमियम ग्रुप मॅनेजमेंट बिझनेसमध्ये एलआयसीचा मोठा हिस्सा आहे. यामुळे लाइफ इन्शुरन्स मार्केटमधील जास्तीत जास्त हिस्सा मिळवण्यात मदत करते. दुसरीकडे, यामुळे त्याच्या कॉस्ट रेश्यो कमी होतो.

एलआयसीने सोमवारी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. प्रति शेअर 1.5 रुपये डिव्हिडेंड जाहीर केला. शेयरहोल्डर्सना आकर्षक डिव्हिडेंडची अपेक्षा होती. मार्च तिमाहीत त्याचा कंसॉलिडेटेड प्रॉफिट 17.41 टक्क्यांनी घसरला आहे. तथापि, नेट प्रीमियम इन्कम 17.88 टक्क्यांनी वाढले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT