Money-Rain
Money-Rain esakal
अर्थविश्व

टाटाचा 7.95 रुपयांचा शेअर पाडतोय पैशांचा पाऊस! वर्षात 2157 टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा

टाटा समूहाची कंपनी Tata Teleservices (Maharashtra) Limited ने आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे.

टाटा (Tata) समूहाची कंपनी TTML म्हणजेच Tata Teleservices (Maharashtra) Limited ने आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा (Refund) दिला आहे. गेल्या एका वर्षात 7.95 रुपयांचा शेअर 2157 टक्‍क्‍यांनी वाढून 171.55 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 15 डिसेंबर रोजी तो NSE वर 7.95 रुपयांवर बंद झाला होता. येथे हा शेअर अनेक दिवसांपासून सतत 5 टक्‍क्‍यांच्या वरच्या सर्किटमध्ये आहे. मात्र, सध्याच्या स्तरावर नफा-वसुली दिसून येत आहे. (Shares of Tata at Rs 7.95 rose 2157 percent in one year)

TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट (Smart Internet) आधारित सेवा सुरू केली आहे. कंपन्यांना जलद इंटरनेट आणि ऑप्टिमाइझ्ड कंट्रोलसह क्‍लाउड आधारित सुरक्षा सेवा मिळत असल्याने याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

क्‍लाउड आधारित सिक्‍युरिटी (Cloud Based Security) हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, जे डेटा सुरक्षित ठेवेल. जे व्यवसाय डिजिटल तत्त्वावर चालत आहेत, त्यांना ही लीज लाइन खूप मदत करेल. यामध्ये सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून (Cyber Fraud) सुरक्षितता अंतर्भूत करण्यात आली असून, त्यासोबतच वेगवान इंटरनेट सुविधाही देण्यात आली आहे.

सप्टेंबर 2021 पर्यंत TTML यामध्ये टाटा समूहाच्या कंपन्यांचा हिस्सा 74.36 टक्के होता, त्यापैकी 74.36 टक्के टाटा टेलिसर्व्हिसेसने नोंदवला होता. त्यापाठोपाठ टाटा सन्सचे (Tata Sons) 19.58 टक्के आणि टाटा पॉवर (Tata Power) कंपनीचे 6.48 टक्के शेअर नोंदवला गेला. याशिवाय TTML यामध्ये वैयक्तिकरीत्या 23.22 टक्के शेअर्स होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT