Share Market Short Term Tips esakal
अर्थविश्व

मेटल सेक्टरचा शेअर शॉर्ट टर्ममध्ये देईल दमदार कमाई!

सकाळ डिजिटल टीम

Stock to Buy: अर्थसंकल्पानंतर (Budget 2022) शेअर बाजारात (Share Market)दोन दिवस तेजी दिसून आली. पण आता प्रॉफिट बुकींगचा काळ सुरु झाला आहे आणि शेअर बाजारात घसरण होताना दिसून येते आहे. पण शेअर बाजारात जेव्हाही घसरण होते तेव्हा काही शेअर्स खरेदी करावेत असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ (Expert) देत आहे. सध्या शेअर बाजारात घसरण सुरु झाली आहे. त्यामुळेच शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी कॅश मार्केटमधून मजबूत स्टॉक निवडला आहे. शॉर्ट टर्मसाठी(Short Term) यात पैसे (Money) गुंतवून तुम्ही चांगली कमाई करु शकता असा विश्वास जैन यांना आहे. संदीप जैन यांनी मॅथन अलॉयजची (Maithan Alloys) निवड केली आहे. (Shares of the metal sector will give strong earnings in the short term)

Maithan Alloys मध्ये का खरेदी करावी ?
ही कंपनी 1985 पासून कार्यरत आहे. कंपनीतील प्रमोटर्सची हिस्सेदारी चांगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीत स्थिर वाढ आहे. कंपनीचे फंडामेंटल्स भक्कम आहेत. याचे स्टॉक्स 7 च्या पीई मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. रिटर्न ऑन कॅपिटल 20 टक्के आहे. शिवाय या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.

Maithan Alloys
सीएमपी (CMP) - 1027.90 रुपये
टारगेट (Target) - 1190/1250 रुपये

या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 25 टक्के आहे. दुसरीकडे, अर्थसंकल्पानंतर मेटल क्षेत्रात चांगली वाढ दिसून येऊ शकते असा अंदाज आहे. सप्टेंबर 2020 मध्ये कंपनीला 55 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीला 124 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीमध्ये प्रोमोटर्सची भागीदारी 75 टक्के आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT