Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market: आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये आयटीसीला सर्वात मोठा घाटा झाला, तो तीन टक्क्यांनी घसरला

शिल्पा गुजर

सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये आयटीसीला सर्वात मोठा घाटा झाला, तो तीन टक्क्यांनी घसरला.

Share Market Big Fall: शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 102 अंकांनी घसरून बंद झाला. आयटीसी, मारुती आणि इन्फोसिला बसलेल्या तडाख्यामुळे शेअर बाजाराला चांगलाच तोटा झाला. 30 शेअर्सचा सेन्सेक्स 101.88 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 60,821.62 अंकांवर बंद झाला. तर एनएसईचा निफ्टी 63.20 अंकांनी म्हणजेच 0.35 टक्क्यांनी घसरून 18,114.90 वर बंद झाला.

सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये आयटीसीला सर्वात मोठा घाटा झाला, तो तीन टक्क्यांनी घसरला. याशिवाय मारुती, इन्फोसिस, एनटीपीसी, एचसीएल टेक आणि टाटा स्टीलमध्येही लक्षणीय घट झाली. दुसरीकडे, एचडीएफसी, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, कोटक बँक, टायटन आणि अॅक्सिस बँकच्या शेअर्समध्ये या काळातही तेजी दिसली.

इतर आशियाई शेअर बाजारांमध्ये, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय कंपोझिट तोट्यात राहिला, तर हाँगकाँगचा हँग सेंग आणि जपानचा निक्केई वधारला. दुपारच्या व्यवहारात युरोपातील प्रमुख शेअर बाजारही वाढले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 0.52 टक्क्यांनी वाढून 85.05 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. स्टॉक एक्स्चेंजकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 2,818.90 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

आज अर्थात सोमवारी कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

- एचडीएफसी (HDFC)

- बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

- कोटक बँक (KOTAKBANK)

- ऍक्सिस बँक (AXISBANK)

- ओएनजीसी (ONGC)

- हिन्डाल्को (HINDLACO)

- कोल इंडिया (COALINDIA)

- टाटा मोटर्स (TATA MOTORS)

- आयटीसी (ITC)

- टाटा कंज्यूमर प्रोडक्ट्स (TATACONSUM)

नोंद : क्रिप्टो मार्केट,शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो,शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT