Share Market
Share Market sakal
अर्थविश्व

Share Market | शेअर बाजारात घसरण! गुंतवणुकदारांसाठी संधी?

शिल्पा गुजर

20 सप्टेंबरनंतर बाजारात मोठी घसरण झाली आहे.

सेन्सेक्स मंगळवारी 1170 अंकांनी घसरून 58,466 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 348 अंकांनी घसरून 17,417 वर बंद झाला. निफ्टी बँक 848 अंकांनी घसरून 37,129 वर बंद झाला. तर मिडकॅप 940 अंकांनी घसरून 30,332 वर बंद झाला. सेक्स आणि निफ्टी दोन्ही जवळपास 2 टक्क्यांनी घसरले आहेत.

20 सप्टेंबरनंतर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स, निफ्टी 20 सप्टेंबरच्या खालच्या पातळीवर बंद झाले आहेत. मंगळवारी 7 महिन्यांतील सर्वात मोठी इंट्रा-डे घसरण झाली. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 शेअर्स घसरले. त्याच वेळी, निफ्टीचे 50 पैकी 42 शेअर्स घसरले. निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. दुसरीकडे, डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी कमजोर होऊन 74.40 वर बंद झाला.

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने डेली स्केलवर मोठी बियरिश कँडल तयार केली आणि सलग चौथ्या ट्रेडिंग सत्रात लोअर हाईज आणि लोअर लोजची स्थापना केली. जर निफ्टी 17,500 च्या खाली राहिला तर ही कमजोरी 17,250 आणि 17,000 कडेही जाऊ शकते असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. दुसरीकडे, वरच्या बाजूला निफ्टीसाठी 17,650 -17,777 च्या रेंजमध्ये रझिस्टन्स दिसून येतो आहे.

आज बाजार कसा असेल ?

मंगळवारी बाजाराने 17600 ची पातळी तोडली आणि नंतर मोठी घसरण झाल्याचे दीनदयाल इन्व्हेस्टमेंट्सचे मनीष हथिरामानी म्हणाले. निफ्टी 17,200 वर असलेल्या त्याच्या सपोर्ट लेव्हलच्या जवळ आला, त्यानंतर त्यात एकदाही उसळी दिसल्याचेही ते म्हणाले.

बाजाराचा शॉर्ट टर्म ट्रेंड खराब झाला आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास निफ्टी 16,850 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, 18,150-18,200 स्तरावर वरच्या बाजूने रझिस्टन्स दिसून येत आहे. जोपर्यंत निफ्टी हा अडथळा पार करत नाही तोपर्यंत निर्देशांकात नकारात्मक ट्रेंड राहील.

टेक्निकली निफ्टीने डेली चार्टवर हेड आणि शोल्डर पॅटर्न ब्रेकडाउन केला आहे आणि नेक लाइनवरून खाली आले आहे असे चॉईस ब्रोकिंगचे सचिन गुप्ता म्हणाले. निफ्टी लोअर बोलिंजर बँड फॉर्मेशनच्या खाली राहिला, जो आगामी काळात कमकुवत होण्याची चिन्हे आहेत असेही ते म्हणाले. निफ्टीला 17,200 वर सपोर्ट आहे. त्याच वेळी, 17,650 वर वरच्या बाजूने लगेचच सपोर्ट आहे. दुसरीकडे, 17,200 वर बँक निफ्टीला सपोर्ट आहे तर 38,500 वरच्या बाजूने रझिस्टन्स दिसत असल्याचे ते म्हणाले.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- बजाज फायनान्स (BAJFINANCE)

- बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

- टाटा मोटर्स (TATA MOTORS)

- रिलायन्स (RELIANCE)

- एनटीपीसी (NTPC)

- आरती इंडस्ट्रीज (AARTIIND)

- अल्केम लॅबोरेट्रीज (ALKEM)

- एल अँड टी टेक्नोलॉजी सर्विसेस लिमिटेड (LTTS)

- भारत फोर्ज (BHARATFORG)

- झी एन्टरटेन्मेंट लिमीटेड (ZEEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT