अर्थविश्व

पायथाॅन डेव्हलपर्सना AI चा राजमार्ग खुला करणारी 'एजन्यूरल'

- सलील उरुणकर

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर आता बहुतांश क्षेत्रात वाढला आहे. आरोग्यापासून शिक्षण क्षेत्रात 'एआय'चा बोलबाला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर आता बहुतांश क्षेत्रात वाढला आहे. आरोग्यापासून शिक्षण क्षेत्रात 'एआय'चा बोलबाला आहे. मात्र, काही क्षेत्रात त्याचा सहजरित्या वापर करणे शक्य नाही. उदाहरणार्थ, रस्त्यावरून धावणाऱ्या चालकरहित मोटारीला जर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे कोणताही निर्णय घेण्यासाठी क्षणाचाही विलंब झाला तर काय अनर्थ होईल हे वेगळे सांगायची गरज नाही.

आर्टिफिशियल इंटलिजन्सची अंमलबजावणी प्रत्येक ठिकाणी करणे किती अवघड आहे हे या उदाहरणावरून आपल्याला जाणवेल. अन्य क्षेत्रातही अशी उदाहरणे आपल्याला देता येतील. म्हणूनच 'एआय'द्वारे माहितीचे विश्लेषण आणि त्याआधारे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील हा विलंब होण्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत असतात त्यावर मात करण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत.

साताऱ्याचे धैर्य बडियानी (Dhairya Badiyani) आणि सर्वेश देवी (Sarvesh Devi) या दोन नवउद्योजकांनी एजन्यूरल (EDGENeural.ai) या त्यांच्या डीप-टेक स्टार्टअपच्या (Deep Tech) माध्यमातून आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या अंमलबजावणीतील हे अडथळे दूर करण्याचे ठरविले आहे. या स्टार्टअपला एनव्हीडीया इन्सेप्शन प्रोग्रॅम, टी-हब, स्टार्टअप इंडिया, मायक्रोसाॅफ्ट फाॅर स्टार्टअप्स, नॅसकाॅम डीपटेक क्लब २.० अशा विविध संस्थांकडून पाठिंबा मिळाला आहे.

आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या अंमलबजावणीतील मर्यादा

आर्टिफिशियल इंटलिजन्सचा अर्थ एखाद्या उपकरणाद्वारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढणे आणि त्या निष्कर्षाच्या आधारे निर्णय घेण्यासाठी त्या उपकरणाला सक्षम करत राहणे. दिवसेंदिवस इंटरनेटला जाेडल्या जाणाऱ्या उपकरणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यातून मिळणारी माहिती (Data) वाढली आहे आणि त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता वाढविण्याचीही गरज भासत आहे. म्हणजे एखाद्या मशीनमधील माहिती ही कोठेतरी अन्य ठिकाणी (Cloud Server) पाठविली व साठविली जाते आणि त्यानंतर या माहितीचे विश्लेषण करून मिळालेले निष्कर्ष पुन्हा आपल्याला पाहिजे त्या डिव्हाईसवर उपलब्ध करून दिले जातात. मात्र जसे माहितीचे प्रमाण वाढते तसे त्याचे विश्लेषण करून नवी माहिती पुन्हा त्या उपकरणावर पाठविण्यासाठीचा वेळ वाढतो. चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीची नितांत आवश्यकता भासते. या सर्व प्रक्रियेमध्ये काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत वेळ लागू शकतो. हा लागणारा वेळ आणि क्लाऊडची गरज या दोन मर्यादांमुळे आर्टिफिशियल इंटलिजन्सची अंमलबजावणी काही यंत्रांमध्ये किंवा परिस्थितीत करता येत नाही. त्यामुळेच जेथे वेळेचे महत्त्व खूप जास्त आहे अशा ठिकाणी (time-critical applications) एआयची अंमलबजावणी करण्यास मर्यादा येत आहेत.

एज डिव्हाईस म्हणजे काय?

क्लाऊड इन्फ्राच्या मर्यादा काढून टाकण्यासाठी एज डिव्हाईसवरच (EDGE Device) आर्टिफिशियल इंटलिजन्सची अंमलबजावणी करण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र हे एज डिव्हाईस म्हणजे नक्की काय? क्लाऊडच्या तुलनेत कोणतेही अल्पक्षमतेचे उपकरण (उदा तुमचा मोबाईल किंवा लॅपटाॅप), ज्याचा आकार छोटा आहे आणि प्रोसेसिंग क्षमता कमी आहे, म्हणजे एज डिव्हाईस.

एज डिव्हाईसवरील एआय म्हणजे काय?

एज डिव्हाईसला आपण लोकल डिव्हाईस किंवा स्थानिक उपकरण म्हणू शकतो. अशा उपकरणांद्वारे मिळालेली माहिती क्लाऊडवर पाठवून त्याचे विश्लेषण करण्याऐवजी, त्या स्थानिक उपकरणावरच ही प्रक्रिया पूर्ण केली तर आपोआपच वेळही वाचेल आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरची गरज भासणार नाही. ही संकल्पना सोपी वाटते मात्र ती प्रत्यक्षात उतरविणे तेवढे सोपे नसते. कारण स्थानिक उपकरणाची क्षमता क्लाऊडसारखी नसते. एजन्यूरल ही स्टार्टअप कंपनी अशा उपकरणांवर एआयची अंमलबजावणी (EDGE AI) करून देण्यासाठी कंपन्यांना मदत करत आहे.

सर्वेश देवी म्हणाले, "एज डिव्हाईसवर एआय माॅडेलची अंमलबजावणी करण्यासाठी साॅफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्हीचे ज्ञान आवश्यक असते. सध्याच्या काळात एआय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या एकतर फक्त साॅफ्टवेअर किंवा फक्त हार्डवेअरवर काम करतात. ही उणिव लक्षात घेत आम्ही एजन्यूरल स्टार्टअप स्थापन केली. ज्या ज्या क्षेत्रात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, इंटरनेट कनेक्शनची समस्या आहे आणि उपकरण दूरवर स्थित आहेत अशा सर्व ठिकाणी एज एआय उपयुक्त ठरणार आहे. माहितीची देवाण-घेवाण होत नसल्यामुळे डेटा सिक्युरिटीचा प्रश्नही आपोआपच मार्गी लागतो."

धैर्य बडियानी म्हणाले, "सामान्यतः एआय प्रोडक्ट प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. अंतिम प्रोडक्टसाठी आणखी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र एज एआय तंत्रज्ञानासाठी हा कालावधी फक्त एक ते तीन महिने एवढाच असतो."

व्यावसायिक माॅडेल

एजन्यूरलचे व्यावसायिक माॅडेल थोडे वेगळे आहे. स्थानिक उपकरणांवर एआयची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी डेव्हलपर प्लॅटफाॅर्म विकसित केला आहे. म्हणजे त्यांचे ग्राहक हे सिस्टिम इंटिग्रेटर, सोल्यूशन बिल्डर किंवा सोल्यूशन प्रोव्हायडर हे असतील. एज डिव्हाईसवर एआयची अंमलबजावणी करण्यासाठी पूरक माहिती आणि व्यवस्था या प्लॅटफाॅर्मद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

धैर्य म्हणाले, "एआय अल्गोरिदम आणि सोल्यूशन विकसित करण्यासाठी पायथाॅन ही सर्वाधिक वापरली जाणारी लँग्वेज आहे. जगभरात ८२ लाख पायथाॅन डेव्हलपर आहे. नजिकच्या भविष्यात, या ८२ लाखांपैकी, किमान ३५ टक्के डेव्हलपर हे एआय अल्गोरिदमवर काम करतील असा अंदाज आहे. त्यापैकी पाच टक्के डेव्हलपर्सला जरी लक्ष्य केले तरी दीड ते दोन लाख जण एजन्यूरल प्लॅटफाॅर्मचा लाभ घेऊ शकतील. संशोधनासाठी किंवा प्रायोगिक तत्त्वावर वापर करणाऱ्यांना हा प्लॅटफाॅर्म मोफत उपलब्ध असेल मात्र व्यावसायिकांना ८४९ डाॅलर प्रति महिना असे शुल्क द्यावे लागेल. या आधारे आम्ही दरमहा ५६ लाख डाॅलरचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT