state-bank-of-india 
अर्थविश्व

स्टेट बँकेला 3,580 कोटींचा नफा; व्याजापोटी बँकेला 22 हजार  954 कोटीचे उत्पन्न 

वृत्तसंस्था

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला (एसबीआय) 3,580 कोटी रुपयांचा तिमाही नफा झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने 838 कोटी रुपयांचा नफा नोंदविला होता. यंदा नफ्यात चार पटीने वाढ झाली आहे.  शुक्रवारी एसबीआयने तिमाही निकाल जाहीर केला.

 बँकेला व्याजातून मिळालेल्या उत्पन्नात वार्षिक आधारावर 0.8 टक्के घसरण झाली आहे. ते आता मार्च तिमाहीत 22 हजार 766 कोटी रुपयांवर पोचले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत व्याजापोटी बँकेला 22 हजार  954 कोटीचे उत्पन्न मिळाले होते. नेट इंटरेस्ट मार्जिन 3.02 टक्के असून त्यात 0.65 टक्क्याची घसरण झाली आहे. 

चौथ्या तिमाहीत देशभरात कोरोनाचे संकट गडद झाले. शिवाय रिझर्व्ह बँकेने देखील सहा महिने "ईएमआय हॉलिडे' दिल्याने बँकांची कामगिरी खालावली आहे. बँकेसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे बुडीत कर्जाचे प्रमाण देखील कमी झाल्याचे बँकेने सांगितले आहे. चौथ्या तिमाहीत बुडीत कर्जाचे प्रमाण 6.15 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. 

व्याजातील उत्पन्नात मात्र घसरण झाली आहे. डिसेंबरच्या तिमाहीत हे प्रमाण 6.91 टक्के होता. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत ते 7.53 टक्के होते. "ईएमआय हॉलिडे'चा 21.8 टक्के ग्राहकांनी घेतला लाभ

रिझर्व्ह बँकेने कोरोना संकटाच्या काळात कर्जदारांना दिलासा देत कर्ज वसुलीला 6 महिन्यांसाठी मुदत दिली आहे. या सुविधेचा 21.8 टक्के ग्राहकांनी लाभ घेतला आहे. एकूण कर्ज वितरणाच्या हे प्रमाण 23 टक्के आहे, अशी माहिती एसबीआयने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Exam: नीट पेपर लीक प्रकरणात नवा खुलासा; २७ एप्रिललाच शुभमच्या हातात प्रश्नपत्रिका... उत्तर प्रदेश - हरियाणा कनेक्शनही समोर

Latur News: लातुरच्या शिक्षण बाजारात ५०० कोटींची उलाढाल, प्रामाणिक पॅटर्नला क्लासेसच्या जीवघेण्या स्पर्धेनं गालबोट, 'मॅनेज'साठी नवा फंडा

Bhimashankar Heritage: भीमाशंकरला होणार ‘हेरिटेज टाउनशिप’; पुनर्वसनासाठी सरकारकडून १७३ कोटींचा निधी मंजूर, ३६ एकर जागेत उभारणार नवी वसाहत..

Lahore Heritage: लाहोरच्या इस्लामपुराचे नाव पुन्हा कृष्णानगर, शहरातील नऊ ठिकाणांची जुनी नावे पुनर्स्थापित; अनेक इमारतींचे संवर्धन..

Latest Marathi News Live Update : अशोक खरातला घेऊन ईडी मुंबईला रवाना

SCROLL FOR NEXT