ITC Share Sakal
अर्थविश्व

ITC चे शेअर्स 3 वर्षांच्या उच्च्चांकाजवळ, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

ITC चे शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये 320 रुपयांची पातळी गाठू शकतात असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञांना वाटत आहे.

शिल्पा गुजर

ITC चे शेअर्स सध्या फुल फॉर्ममध्ये आहेत. मार्च 2022 चे तिमाही निकाल चांगले आलेत आणि यातच त्याचे शेअर्स 3 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलेत. ITC च्या शेअर्सने आज तेजीने सुरुवात केली आणि लगेचच NSE वर 282.35 रुपयांवर पोहोचले. अशातच ITC चे शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये 320 रुपयांची पातळी गाठू शकतात असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञांना वाटत आहे.
सध्या हा स्टॉक पूर्ण ट्रेंडमध्ये आहे आणि येत्या ट्रेडिंग सत्रांमध्ये शॉर्ट टर्ममध्ये वाढ होऊ शकते असे एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजचे मुदित गोयल म्हणाले. अलीकडेच त्यांनी 255 रुपयांवर क्लोजिंग आधारावर ब्रेकआउट दिला आहे. त्यामुळे, ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे त्यांनी 320 रुपयांच्या शॉर्ट टर्म टारगेटसाठी हे शेअर्स ठेवावे असा सल्ला त्यांनी दिला.

आयटीसीने दुसऱ्या तिमाहीत चौथ्या तिमाहीत सिगारेट वॉल्यूममध्ये सुमारे 9 टक्क्यांच्या वाढीसह चांगली कामगिरी केल्याचे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे. येत्या काळात हा शेअर आणखी वाढेल असा विश्वासही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
कंपनीच्या FMCG व्यवसायाचा वाढीचा दर सुमारे 12 टक्के असू शकतो. कंपनीचा हॉटेल आणि कृषी व्यवसायही मजबूत राहण्याची अपेक्षा आहे.
ITC चे शेअर्स मागील 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये तेजीच्या मूडमध्ये आहे. गेल्या 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर 254 रुपयांवरून 281 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्यात 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 24 फेब्रुवारी 2022 पासून आतापर्यंत या शेअरने 25 टक्के परतावा दिला आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT