Today's Share Market Updates
Today's Share Market Updates File Photo
अर्थविश्व

घसरणीनंतर गुरूवारी शेअर बाजारात रिकव्हरी, आजचे टॉप 10 शेअर्स कोणते? 

शिल्पा गुजर

शेअर बाजारात जानेवारीच्या शेवटच्या दिवशी रिकव्हरी दिसून आली. निफ्टी बँकेत शॉर्ट कव्हरिंगमुळे बाजारात चांगले वातावरण दिसून आले. निफ्टी खालच्या पातळीपासून 280 अंकांच्या सुधारणासह बंद झाला. निफ्टी बँकेतही जोरदार ऍक्शन बघायला मिळाली. बँकिंग आणि ऑटो शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. PSU बँक निर्देशांकात 4 महिन्यांत मोठी उसळी पाहायला मिळाली. निफ्टी बँक खालच्या पातळीवरून 970 अंकांच्या सुधारणासह बंद झाला.

गुरूवारच्या व्यवहारात आयटी, फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल शेअर्समध्ये विक्री झाली. मारुतीमध्ये दुसऱ्या दिवशी चांगली वाढ दिसून आली आणि मारुती साडेतीन वर्षांच्या उच्च पातळीवर बंद झाला.(Share Market Today's News Updates)

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 581.21 अंकांनी म्हणजेच 1 टक्क्यांनी घसरून 57,276.94 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 167.80 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी घसरून 17,110.15 वर बंद झाला. (Today's Sensex & Nifty Updates)

गुरूवारच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या 30 पैकी 21 शेअर्सची विक्री झाली तर निफ्टीच्या 50 पैकी 35 शेअर्सनी घसरण झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 9 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. दूसरीकडे रुपया 29 पैशांनी घसरून 75.07 वर बंद झाला.

आज बाजार कसा चालेल?(Stock Market Today's Updates)

निफ्टीला 17060 ची पातळी चांगला सपोर्ट असेल असे इक्विटी 99 चे राहुल शर्मा म्हणाले. शुक्रवारी अर्थात आज इंट्राडेमध्ये ही पातळी तुटली तर पुढचा सपोर्ट 16990 असेल आणि त्यानंतर मोठा सपोर्ट 16880 वर असेल. 17185 वर निफ्टीला मजबूत रझिस्टेंस म्हणून काम करेल. ही पातळी वरच्या दिशेने तुटली तर निफ्टी 17250-17300 वरही जाऊ शकतो असे ते म्हणाले.

गुरुवारी इंट्राडेमध्ये प्रचंड अस्थिरता होती असे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. खाली निफ्टीने 16836 चा नीचांक कायम राखला आहे. अशा स्थितीत निफ्टीला 16825 वर मजबूत सपोर्ट दिसत आहे. आजच्या व्यवहारात बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. 16825-16800 वर मजबूत सपोर्ट आहे. जर निफ्टी 16800 च्या खाली गेला तर ही घसरण आणखी वाढू शकते आणि जर तो 16800 च्या वर टिकला तर त्यात रिकव्हरी दिसून येईल असेही रुपक डे म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स ?

  • अॅक्सिस बँक (AXISBANK)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • सिप्ला (CIPLA)

  • मारुती (MARUTI)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड (SRTRANSFIN)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • एयू बँक (AUBANK)

  • ग्रामीण विद्युकरण निगम लिमिटेड (RECLTD)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT