Today's Share Market Updates | Stock Market News
Today's Share Market Updates | Stock Market News sakal media
अर्थविश्व

Share Market : शेअर बाजाराचं पुन्हा रॉकेट! सेन्सेक्स 778 तर निफ्टी 213 अंकांनी वधारला

सकाळ डिजिटल टीम

Share Markets updates: चीनमध्ये कोविड-19 (Covid-19)ची वाढत जाणारी प्रकरणे, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि यूएस फेडची आगामी बैठक यामुळे शेअर बाजारात (Share Market) अनिश्चिततेचे वातावरण यामुळे काल शेअर बाजारात मोठी घसरण झाली. परंतु आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजार पुन्हा रुळावर आला. सेन्सेक्स 778.48 अंकांनी अर्थात 1.40 टक्क्यांनी वधारून 56555.33 वर सुरु झाला, तर निफ्टी 213.65 अंकांनी म्हणजेच 1.28 टक्क्यांनी वधारून 16876.65 वर सुरु झाला. (Stock market rises! The Sensex gained 778 points while the Nifty opened at 16876)

सेन्सेक्स-निफ्टी मंगळवारी 1 टक्‍क्‍यांहून अधिक घसरून बंद झाले, आणि यासोबतच गेल्या 5 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. मंगळवारच्या व्यवहारात ऑटो सोडता सर्वच सेक्टर्समध्ये विक्री दिसून आली. दुपारच्या व्यवहारात विक्रीचा दबाव वाढला. याचे कारण चीनमध्ये कोविड-19 (Covid-19)ची वाढत जाणारी प्रकरणे ठरली. याशिवाय रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि यूएस फेडची आगामी बैठक यामुळे शेअर बाजारात (Share Market) अनिश्चिततेचे वातावरण आहे. शेवटच्या ट्रेडिंग तासात बाजारात थोडी रिकव्हरी झाली असली तरी अखेरीस तो लाल चिन्हाने बंद झाला.

मंगळवारी सेन्सेक्स (Sensex) 709.17 अंकांनी म्हणजेच 1.26 टक्क्यांनी घसरून 55,776.85 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty)208.30 अंकांनी म्हणजेच 1.23 टक्क्यांनी घसरून 16,663.00 वर बंद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पाऊसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT