stock market Marathi News stock market Marathi News
अर्थविश्व

Stock Market : सेन्सेक्स-निफ्टीची घसरण, तर टाटा स्टीलला सर्वाधिक लाभ

सकाळ डिजिटल टीम

मागच्या आठवड्यातील वाढीनंतर सोमवारी (ता. २५) बाजारात घसरण पाहायला मिळाली. दिवसभराच्या व्यवहारानंतर शेअर बाजार (stock market) लाल चिन्हावर बंद झाला. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ३०६.०१ अंकांनी म्हणजे ०.५५ टक्क्यांच्या घसरणीसह ५५,७६६.२२ वर बंद झाला. याशिवाय निफ्टी निर्देशांक ८८.४५ अंकांनी म्हणजे ०.५३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. (stock market Marathi News)

सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी बहुतांश सेक्टर्स लाल चिन्हाने (stock market) बंद झाले आहेत. याशिवाय आज फक्त मेटल आणि आयटी क्षेत्रात वाढ दिसून आली. दुसरीकडे, निफ्टी ऑईल अँड गॅस, कंझ्युमर ड्युरेबल, हेल्थकेअर, रियल्टी, प्रायव्हेट बँक, पीएसयू बँक, फार्मा, मीडिया, एफएमसीजी, वित्तीय सेवा, ऑटो आणि निफ्टी बँक क्षेत्र घसरले आहेत.

एमॲण्डएम, रिलायन्स, मारुती, कोटक बँक, अल्ट्रा केमिकल, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, डॉ. रेड्डी, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड, सन फार्मा, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, एअरटेल आणि टीसीएसच्या शेअर्सवरही इन्फोसिस, भारती एरटेलचे शेअर विकले गेले.

सेन्सेक्समधील (Sensex) टॉप-३० समभागांपैकी १३ समभाग तेजीने बंद झाले आहेत. याशिवाय १७ समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली. आज टाटा स्टील टॉप गेनर ठरला आहे. याशिवाय इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, विप्रो, एनटीपीसी, एसबीआय, एलटी, आयटीसी, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि टायटन यांच्या समभागातही वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सुनावणीत अचानक तणाव वाढला… सरन्यायाधीशांचे शब्द ऐकून वकीलही थबकले! संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारी इनसाइड स्टोरी!

Ind vs SA 2nd ODI : रोहित-विराटवर पुन्हा मदार; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्याची संधी, आज दुसरा एकदिवसीय सामना....

DRDO Internship 2025: DRDO मध्ये पेड इंटर्नशिपची संधी, स्टायपेंडही मिळणार; येथे जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख

Malshiras Accident: 'कंटेनरच्या धडकेत उंबरेतील दुचाकीस्वार ठार'; माळशिरस बाय पासवरील घटना, कंटेनर वळला अन्..

Satara News: 'साताऱ्यात पालिकेसाठी सरासरी ५८.६० टक्के मतदान'; काही ठिकाणी हाणामारी; अनेक केंद्रांत रात्री उशिरापर्यंत गर्दी !

SCROLL FOR NEXT