अर्थविश्व

Stock Market : हे 4 ऑटो स्‍टॉक्‍स येत्या काळात करतील दमदार परफॉर्म

सकाळ डिजिटल टीम

Stock Market : शेअर बाजारात सध्या अस्थिरता दिसून येत आहे. त्यात बिझनेस ट्रिगर्स आणि कॉर्पोरेट डेव्हलपमेंटमुळे काही स्टॉक्स मजबूत तर काही स्टॉक्स कमकुवत दिसत आहेत. जागतिक ब्रोकरेज हाऊसेसने काही शेअर्सवर त्यांचे रेटिंग जारी केले आहेत आणि काही शेअर्सचे टारगेटही बदलले आहेत. यात टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एस्कॉर्ट्स कुबोटा यांचा समावेश आहे.

टाटा मोटर्स (Tata Motors)

जागतिक ब्रोकरेज मॅक्वेरीने (Macquarie) टाटा मोटर्सवर आउटपरफॉर्म रेटींग दिले आहे. यात टारगेट 503 रुपयांचे आहे. त्याच वेळी क्रेडिट सुईसने (Credit Suisse) टाटा मोटर्सबाबतचे न्युट्रल रेटींग कायम ठेवले आहे. तसेच 438 रुपयांवरून 425 रुपये करण्यात आले आहे. 15 सप्टेंबर 2022 ला शेअरची किंमत 447 रुपयांवर होती.

हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp)

स्थानिक ब्रोकरेज सीएलएसएने (CLSA) हिरो मोटोकॉर्पवर आउटपरफॉर्म रेटींग दिले आहे. टारगेट 2962 रुपये दिले आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी शेअर 2790 रुपयांवर होती.

महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra)

जागतिक ब्रोकरेज मॅक्वेरीने (Macquarie) महिंद्रा अँड महिंद्राला आउटपरफॉर्म रेटींग दिले आहे. तरीही टारगेट बदलून 1386 रुपये करण्यात आले आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 1297 रुपयांवर होती.

एस्कॉर्ट्स कुबोटा (Escorts Kubota)

जागतिक ब्रोकरेज मॅक्वेरीने एस्कॉर्ट्स कुबोटाला न्युट्रल रेटींग दिले आहे. प्रति शेअर टारगेट 1677 रुपये दिले आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी स्टॉकची किंमत 2001 रुपयांवर होती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT