Share Market File Photo
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजाराची अडखळती सुरुवात! सेन्सेक्स 37 तर निफ्टी 27 अंकांनी घसरला

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Update: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. गुरुवारच्या नकारात्मक कामगिरीचं सावट आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात दिसून येत आहे. आज सकाळी शेअर बाजार किंचित घसरणीसह सुरु झाला. सेन्सेक्स 37.78 अंकांच्या घसरणीसह 58,530.73वर सुरु झाला, निफ्टी 27.85 अंकांच्या घसरणीसह 17,436.90वर सुरु झाला. (Stock market starts to stumble! The Sensex fell by 37 points and the Nifty by 27 point)

गुरूवारी सलग 3 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला आणि आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार लाल चिन्हात बंद झाला. सेन्सेक्स 115.48 अंकांनी म्हणजेच 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह 58,568.51 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 33.50 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 17464.75 वर बंद झाला.

या वर्षभरातील बाजाराच्या हालचालींवर नजर टाकल्यास 2021-22 हे आर्थिक वर्ष भारतीय बाजारपेठेसाठी अनेक घडामोडींनी भरलेले वर्ष ठरले. या वर्षी भारतीय बाजारपेठेने अभूतपूर्व तेजी पाहिली आणि ऑक्टोबरमध्ये विक्रमी उच्चांक गाठला, पण त्यानंतर यूएस फेडचा कठोर दृष्टीकोन, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वाढत्या जियोपॉलिटिकल तणावामुळे वातावरण बदलले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT