Suhas Rajderkar writes Buy top shares for just five thousand rupees esakal
अर्थविश्व

अवघ्या पाच हजार रुपयांत घ्या ‘टॉप’चे शेअर!

शेअर बाजार ‘वर’ गेला, म्हणजे बाजारातील सर्व शेअर ‘वर’ गेले का? अर्थातच नाही. संपूर्ण बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे ‘बीएसई सेन्सेक्स ३०’ आणि ‘एनएसई निफ्टी ५०’ हे इंडेक्स वाढले किंवा ‘वर’ गेले, असा याचा अर्थ असतो.

सुहास राजदेरकर suhas.rajderkar@gmail.com

शेअर बाजार ‘वर’ गेला, म्हणजे बाजारातील सर्व शेअर ‘वर’ गेले का? अर्थातच नाही. संपूर्ण बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे ‘बीएसई सेन्सेक्स ३०’ आणि ‘एनएसई निफ्टी ५०’ हे इंडेक्स वाढले किंवा ‘वर’ गेले, असा याचा अर्थ असतो.

शेअर बाजार ‘वर’ गेला, म्हणजे बाजारातील सर्व शेअर ‘वर’ गेले का? अर्थातच नाही. संपूर्ण बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे ‘बीएसई सेन्सेक्स ३०’ आणि ‘एनएसई निफ्टी ५०’ हे इंडेक्स वाढले किंवा ‘वर’ गेले, असा याचा अर्थ असतो. जगप्रसिद्ध शेअर बाजार गुंतवणूकदार, उद्योजक वॉरेन बफे आणि बेंजामिन ग्रॅहम हे छोट्या गुंतवणूकदारांना नेहमी ‘इंडेक्स’ योजनांची शिफारस करतात. फक्त एक लक्षात घेतले पाहिजे, की अमेरिकी इंडेक्समध्ये एकूण लिस्टेड शेअरच्या साधारणपणे १० टक्के इतके शेअर असतात; परंतु भारतात मात्र हे प्रमाण जेमतेम एक टक्का आहे.

म्युच्युअल फंडांच्या ‘इंडेक्स’ योजना असतात. या योजनांमधील गुंतवणूक ही फक्त ‘निफ्टी’ किंवा ‘सेन्सेक्स’मध्ये सामील असलेल्या शेअरमध्येच केली जाते व ती सुद्धा, प्रत्येक शेअरला असलेल्या विशिष्ट वजनानुसारच (वेटेज) केली जाते. त्यामुळेच याला ‘पॅसिव्ह फंड’ असेही म्हणतात. फंड मॅनेजर त्याच्या मर्जीनुसार ‘निफ्टी’ किंवा ‘सेन्सेक्स’ व्यतिरिक्त इतर शेअरची खरेदी करू शकत नाही.

इंडेक्स फंडाचे फायदे...

  • इंडेक्समध्ये सर्व विभागामधील कंपन्यांचे शेअर असतात. त्यामुळे, गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीमध्ये विविधता (डायव्हर्सिटी) मिळते.

  • म्युच्युअल फंडांच्या इतर योजनांच्या तुलनेत, या योजनेचा खर्च खूपच कमी असतो, ज्यामुळे परतावा वाढू शकतो.

  • इंडेक्स योजनांमध्ये फक्त लार्जकॅप शेअर असल्यामुळे इतर मिड आणि स्मॉलकॅप शेअरपेक्षा अस्थिरता आणि जोखीम कमी असते.

  • ‘निफ्टी’ अथवा ‘सेन्सेक्स’मध्ये असलेले शेअर तुम्ही त्याच प्रमाणात थेट बाजारामधून विकत घ्यायचे ठरवले, तर ते किचकट ठरेल आणि त्यासाठी (कमीतकमी) काही लाख रुपये लागतील. कारण तुम्हाला प्रत्येकी एक शेअर तर घ्यावाच लागेल. अजून आपल्या देशात आपण एकापेक्षा कमी शेअर खरेदी करू शकत नाही. पुढे ती शक्यता आहे. परंतु, ‘इंडेक्स’ योजनेमध्ये गुंतवणूकदार फक्त ५,००० रुपये गुंतवून सुद्धा, ‘निफ्टी’चे किंवा ‘सेन्सेक्स’चे संपूर्ण ‘बास्केट’ विकत घेऊ शकतात.

  • म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाते लागत नाही.

आज देशामध्ये विविध म्युच्युअल फंडांच्या १७ ‘इंडेक्स ईटीएफ’ आणि १९ ‘इंडेक्स’ योजना सुरू आहेत; ज्या सतत खुल्या असतात. निव्वळ मालमत्तांनुसार त्यामध्ये केव्हाही गुंतवणूक करता येते. यामधील सर्वांत जुन्या योजनांपैकी, एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या दोन इंडेक्स योजनांनी नुकतीच २० वर्षे पूर्ण केली आहेत. ‘एचडीएफसी निफ्टी ५०’ आणि ‘एचडीएफसी इंडेक्स बीएसई सेन्सेक्स’ या योजनांनी गुंतवणूकदारांना २० वर्षांमध्ये १५ टक्के इतका परतावा दिला आहे. योजनांची एकूण मालमत्ता अनुक्रमे ५,९४१ आणि ३,३९० कोटी रुपये इतकी आहे.

१९९९ मध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंडाची स्थापना झाली आणि ३ जुलै २००० रोजी ‘सेबी’ने एचडीएफसी म्युच्युअल फंडाला मान्यता दिली. त्यानंतर दोनच वर्षात त्यांनी ‘इंडेक्स’ योजना बाजारात आणल्या. गेल्या २३ वर्षांमध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंडाने चांगली कामगिरी केली असून, आता फंडाची एकूण मालमत्ता ४,१३,००० कोटी रुपयांवर पोचली आहे आणि साधारण एक कोटी गुंतवणूकदार त्यांच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत. नवनीत मुनोत हे फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असून, त्यांना ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये कंपनीचे शेअर बाजारामध्ये लिस्टिंग झाले आहे.

अर्थात म्युच्युअल फंडामधील कोणत्याही योजनेमध्ये मूळ मुद्दल अथवा परताव्याची खात्री नसते. ‘इंडेक्स’ योजनासुद्धा याला अपवाद नाहीत. त्यामुळे, गुंतवणूकदारांनी तज्ज्ञ व अनुभवी सल्लागाराची मदत घेणे योग्य ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT