Sukanya Samriddhi Yojana esakal
अर्थविश्व

Sukanya Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत मोठे बदल; जाणून घ्या नवे नियम

सकाळ डिजिटल टीम

सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून कन्येच्या नावानं दर महिन्याला थोडीफार बचत केली जाते.

सुकन्या समृद्धी योजनेच्या (Sukanya Samriddhi Yojana) माध्यमातून कन्येच्या नावानं दर महिन्याला थोडीफार बचत केली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास मुलगी 21 वर्षांच्या झाल्यावर तिला लाखो रुपये मिळू शकतात. आता जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवणार असाल, तर जाणून घ्या यातील बदल. सरकारनं या योजनेत मोठा बदल केलाय.

मोदी सरकारनं (Modi Government) 2 जानेवारी 2015 रोजी 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' या योजनेची सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी केंद्रातील मोदी सरकारनं 'सुकन्या समृद्धी योजना' सुरु केलीय.

आता तीन मुलींनाही मिळणार लाभ

या योजनेत 80 C अंतर्गत फक्त पहिल्या दोन मुलींच्या खात्यावर कर सूट देण्याची तरतूद होती. यामध्ये तिसऱ्या मुलीला हा लाभ मिळत नव्हता. नवीन नियमांनंतर आता जर एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली असतील, तर त्या दोघांसाठीही खातं उघडण्याची सुविधा आहे. वडिलांना तीन मुली असतील, तर तिघांच्याही नावे पैसे जमा करता येणार आहेत.

मुदतीशिवाय व्याज मिळेल

सरकारच्या या योजनेत वर्षाला किमान 250 रुपये आणि जास्तीत-जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. खाते किमान रकमेवर डीफॉल्ट आहे. नवीन नियमांनुसार, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास मॅच्युरिटी होईपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दरानं व्याज दिलं जाणार आहे.

प्रत्येक आर्थिक वर्षात वार्षिक व्याज

नवीन नियमांनुसार, खात्यातील चुकीचं व्याज परत करण्याची तरतूद नाहीय. सुकन्या योजना खात्यावरील वार्षिक व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा केलं जाईल.

खातं वेळेपूर्वी बंद केलं जाऊ शकतं

मुलीच्या मृत्यूनंतर किंवा मुलीचा पत्ता बदलल्यानंतर या योजनेचं खातं बंद केलं जाऊ शकतं. मात्र, आता यामध्ये खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही समावेश करण्यात आलाय. पालकाचा मृत्यू झाल्यास खातं मुदतीपूर्वी बंद केलं जाऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT