Home Loan Sakal
अर्थविश्व

होम लोन घेताय? EMI किती असावा, कसा भरावा? जाणून घ्या सर्वकाही

होम लोन (Home Loan) घेताना घ्या या गोष्टींची काळजी. कसा भरताय तुम्ही तुमचा EMI ? पाहा जाणकार नेमके काय सांगतात.

सुमित बागुल

होम लोन (Home Loan) घेताना घ्या या गोष्टींची काळजी. कसा भरताय तुम्ही तुमचा EMI ? पाहा जाणकार नेमके काय सांगतात.

Home Loan Tips: तुम्हीही होम लोन घेण्याचा विचार करताय ? की आधीच होम लोन घेतले आहे ? मग ही बातमी तुम्हाला मदत करू शकते. किती EMI ठेवणे योग्य असेल ? EMI वाढवून लवकर होम लोन (Home Loan) पासून सुटका करायची ? की दीर्घ काळापर्यंत लोन भरत रहायचे असे अनेक प्रश्न असतात. जाणून घेऊयात याची उत्तरे...

प्रत्येकालाच होम लोनच्या जाळ्यातून लवकर मुक्त व्हायचे असते. होम लोनबाबत अनेक समज गैरसमजहते. जाणकार काय सांगतात ते पाहुयात कारण जाणकारांचे मत याबाबत वेगळेच आहे.

किती ठेवावा EMI ?

EMI ची रक्कम तुमच्या उत्पन्नानुसार ठरवावी असे तज्ज्ञ सांगतात. होम लोनचा EMI तुमच्या पगाराच्या (Total Take Home Salary) 35 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा असे फायनांशिअल प्लॅनर तारेश भाटिया यांचे म्हणणे आहे. समजा तुमचा पगार 1 लाख रूपये (टेक होम) आहे, तर तुमचा EMI हा 35 हजारांपेक्षा जास्त नसावा. जर तुम्ही एकापेक्षा जास्त लोन घेतले असतील तरीही 40 टक्क्यांपेक्षा जास्त EMI नसावा असे भाटिया यांचे म्हणणे आहे.

पगार वाढल्यावर EMI वाढवावा ?

समजा तुमचा पगार 10 हजारांनी वाढला तर EMI ची रक्कम वाढवण्याकडे अनेकांचा प्रघात असतो. पण तज्ज्ञ EMI वाढवण्याचा सल्ला देत नाहीत. होम लोन (Home Loan) वर तुम्हाला 6-7 टक्के व्याज द्यावे लागते. त्यामुळे EMI न वाढवणेच फायद्याचे ठरेल असे जाणकार सांगतात. वाढलेला पगार चांगल्या फंडमध्ये गुंतवा ज्यात तुम्हाला 12-14 टक्के रिटर्न्स मिळतात.

वेळेआधीच होम लोन संपवायचे का ?

जर तुमच्याकडे एकरकमी पैसे येत आहेत तर तुम्ही होम लोन (Home Loan) एकत्र भरून टाकण्याबाबतही जाणकारांचे मत वेगळे आहे. तुमच्याजवळ जर काही लाख येत आहेत तर ते चांगल्या फंडमध्ये गुंतवा ज्यावर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. तुम्ही एकत्र होम लोन भरले तरी तुम्हाला लोनवरील संपूर्ण इंटरेस्ट रेट भरायचा आहेच त्यात काहीही कमी होणार नाही. मग एकत्र पैसे भरून होम लोन संपवण्यापेक्षा हे पैसे चांगल्या स्किममध्ये टाकण्याचा सल्ला जाणकार देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT