शेअर बाजारातील अनेक शेअर्सने गेल्या काही काळात चांगला परतावा दिला आहे. पण, असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी दिलेला रिटर्न विश्वास न बसण्याइतका तगडा आहे. असाच एक स्टॉक म्हणजे टाटा ग्रुपचा टायटन. हा शेअर गुंतवणूकदारांसाठी करोडपती स्टॉक ठरला आहे. गेल्या 23 वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा देऊन श्रीमंत केले आहे. टायटनच्या शेअर्सने 2000 सालापासून 57,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
टायटन शेअर्सच्या किंमतीचा इतिहास
2000 साली टायटनचा शेअर फक्त 4 रुपये होता (NSE वर क्लोजिंग किंमत). 2022 मध्ये, बुधवारी हा स्टॉक 2,487 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे टायटनच्या स्टॉकने 21 वर्षांत 57,000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. गेल्या 10 वर्षांत शेअरची किंमत 210 रुपयांवरून 2487 रुपयांपर्यंत वाढली आहे. टायटन स्टॉकने 10 वर्षांत गुंतवणूकदारांना 1,000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. 5 वर्षांपूर्वी टायटनच्या शेअर्सची किंमत NSE वर 432 रुपये होती. पाच वर्षांत सुमारे 465% परतावा दिला आहे. तर 1 वर्षात टायटनचा शेअर 1541.70 रुपयांवरून 2,487 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत 58.26% चा जबरदस्त परतावा दिला आहे.
टायटनच्या चार्ज पॅटर्ननुसार, 2000 मध्ये, एखाद्या गुंतवणूकदाराने टायटनच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य 5.70 कोटी रुपयांवर पोहोचले असते. त्याच वेळी, 10 वर्षांपूर्वी कोणीतरी त्याच्या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज त्याची किंमत 11.56 लाख रुपये असेल.
आणखी तेजी येणार
ब्रोकरेज फर्म जेफरीजने टायटनच्या स्टॉकमधील होल्ड रेटिंग कायम ठेवली आहे. 2300 रुपयांवरून 2600 रुपयांपर्यंत टारगेट ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, मॉर्गन स्टॅन्लेने टायटनला ओव्हरवेट रेटिंग दिले आहे आणि 2,501 रुपयांवरून 2720 रुपयांपर्यंत टारगेट सेट केले आहे. मॅक्वेरीने ओव्हरवेटचे रेटिंगही कायम ठेवले आहे. खरेदीचे टारगेट 3350 रुपये आहे. जेपी मॉर्गनने न्यूट्रलचे रेटिंग कायम ठेवले आहे आणि टारगेट 2700 वरून 2800 रुपये केली आहे. HSBC ने आपला बाय पॉइंट कायम ठेवला आहे आणि 3050 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.
राकेश झुनझुनवाला अजुनही टायटनबाबत बुलिश
बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओचा हा सर्वात आवडता स्टॉक आहे. टायटन कंपनीच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2021 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, झुनझुनवाला यांच्याकडे 3,57,10,395 शेअर्स आहेत जे 4.02 टक्क्यांच्या भागीदारीबरोबरीचे आहेत. त्याच वेळी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये 95,40,575 शेअर्स अर्थात 1.07 टक्के हिस्सा आहे. गेल्या तिमाहीतही राकेश झुनझुनवाला यांनी टायटनमधील त्यांचे स्टेक 0.22% ने वाढवले आहेत. म्हणजे त्यांचा या शेअर्सवरचा विश्वास अजूनही कायम आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.