TATA shares esakal
अर्थविश्व

टीसीएसच्या शेअर्समध्ये मिळेल तगडा परतावा, तुमच्याकडे आहे का ?

धनश्री ओतारी

गेल्या बऱ्याच काळापासून शेअर बाजारात अस्थिर वातावरण आहे, पण अशा अस्थिर वातावरणातही काही शेअर्सनी कमाल केली आहे. त्यातच टाटा ग्रुपचा आयटी शेअर टीसीएसचा समावेश होतो. तुम्हालाही शेअर बाजाराच्या अस्थिर काळात काही शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करायचे असतील तर तुम्ही टीसीएसचा विचार करु शकता असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ देत आहेत. ब्रोकरेज फर्म शेअरखानने टीसीएसवर खरेदीचे मत (Buy Rating) कायम ठेवले आहे. कंपनीचे बिझनेस मॉडेल चांगले आहे आणि ऑर्डर बुक मजबूत आहे.

ग्रोथ आणि ट्रान्सफॉर्मेशन (G&T) इनीशिएटिव्ज, तंत्रज्ञान आणि ऑपरेशन्सवर जास्त खर्चामुळे मागणी मजबूत आहे. यामुळे कंपनीच्या वाढीला चांगली चालना मिळू शकते. आयटी उद्योगातील सर्व सेगमेंट्समध्ये मार्केट शेअर मिळवण्यात TCS चा मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे.

23% वाढ अपेक्षित

शेअरखानने टीसीएसवर बाय रेटींग कायम ठेवली आहे. तसेच, टारगेट 3800 रुपये ठेवण्यात आली आहे. 17 जून 2022 रोजी शेअर 3088 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच, स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 23 टक्क्यांची वाढ पाहू शकतो. 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉकमध्ये सुमारे 18 टक्के सुधारणा झाली आहे. मात्र, गेल्या 5 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर हा शेअर मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. गुंतवणूकदारांना टीसीएसच्या स्टॉकमध्ये 165% पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT