Tata Mutual Fund's new plan Can start from 5000 interest rate
Tata Mutual Fund's new plan Can start from 5000 interest rate 
अर्थविश्व

Tata Mutual Fundची नवी योजना; 5,000 रुपयांपासून करा गुंतवणूक

शिल्पा गुजर

टाटा म्युच्युअल फंड (Tata Mutual Fund) या देशातील आघाडीच्या कंपनीने टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ईटीएफ एफओएफ निफ्टी मिडकॅप 50 इंडेक्स फंड (Tata Nifty India Digital ETF FoF) लाँच केला आहे. या एनएफओचे (New Fund Offer) सबस्क्रिप्शन 25 मार्च सुरु झाले आहे. तुम्ही 8 एप्रिल 2022 पर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकता. ही एक ओपन एंडेड योजना आहे. त्याचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी इंडिया डिजिटल इंडेक्स (Nifty India Digital Index (TRI) आहे.

5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता

टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ETF FoF मध्ये किमान 5,000 रुपये आणि त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येऊ शकते. हा फंड इक्विटी सेक्‍टरल-टेक्‍नोलॉजी कॅटेगरीतला आहे. या योजनेच्या फंड मॅनेजर मिता सेट्टी आहेत. हा ओपन एंडेड फंड ऑफ फंड, स्कीम टाटा निफ्टी इंडिया डिजिटल एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये गुंतवणूक करेल.

स्मार्टफोनचा वाढता वापर, कमी डेटा दर आणि UPI चा वाढता वापर यामुळे भारतात डिजिटायझेशन होत आहे. त्यामुळे इंटरनेट, स्मार्टफोन, ऑनलाइन पेमेंट आणि डेटा वापरणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कंपन्यांच्या डिजिटायझेशनला चालना मिळण्यास मदत होईल. लाँग टर्म संपत्ती निर्माण करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी टाटा निफ्टी इंडिया डिजिटल ईटीएफ एफओएफ हा एक चांगला पर्याय आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT