Share Market Updates sakal
अर्थविश्व

शेअर बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स 985, तर निफ्टी 241 अंकांनी वधारला

Share Market Updates: सकाळी स्थिर पातळीवर सुरु झालेल्या शेअर बाजाराने दिवसभरात दमदार कामगिरी केली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: गेल्या आठवड्यात लगातार चार दिवस सकारात्मक कामगिरीनंतर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीही शेअर बाजारानं सकारात्मक कामगिरी केली आहे. शेअर बाजाराचा चढता आलेख आजही सुरुच राहिला. सकाळी स्थिर पातळीवर सुरु झालेल्या शेअर बाजाराने दिवसभरात सातत्यपूर्ण दमदार कामगिरी केली. शेअर बाजार बंद झाला तेव्हा दोन्ही निर्देशांकात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 985.27 अंकांनी अर्थात 1.77 टक्क्यांनी वधारून 56,535.57 वर बंद झाला, तर निफ्टीही 240.85 अंकांनी अर्थात 1.45 टक्क्यांनी वधारून 16,871.30 वर बंद झाला. दिवसअखेर 37 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 13 शेअर्समध्ये घट झाली. (Stock market rose sharply, Nifty and the Sensex rose)

रशिया-युक्रेन युद्धामुळे सातत्याने ढासळत असलेला शेअर बाजार गेल्या आठवड्यात सावरल्याचं पाहायला मिळालं होतं. मंगळवार ते शुक्रवार सलग चार दिवस शेअर बाजार सातत्याने वधारला. आज सकाळीही शेअर बाजार स्थिर पातळीवर सुरु झाला. सेन्सेक्स 64.1 अंकांच्या वाढीसह 55614.40वर सुरु झाला होता, तर निफ्टी 3.25 अंकांच्या वाढीसह 16,633.70वर सुरु झाला.

तत्पूर्वी प्रचंड अस्थिरतेच्या दरम्यानही शुक्रवारी बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाला होता. सेन्सेक्स (Sensex) 85.91 अंकांच्या अर्थात 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 55,550.30 वर बंद झाला होता. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 35.55 अर्थात 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 16630.45 वर बंद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT