‘द वॉरन बफे वे’ sakal
अर्थविश्व

Book : ‘द वॉरन बफे वे’

गुंतवणूक पद्धतीचा सखोल अभ्यास करायचा आहे, अशांसाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

अतुल सुळे (बॅंकिंग क्षेत्राचे अभ्यासक)

या पुस्तकाचे लेखक एक अनुभवी पोर्टफोलिओ मॅनेजर आहेत. त्यांच्या या जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळविलेल्या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या असून, तीन लाखांपेक्षा अधिक प्रतींची विक्री झाली आहे. या पुस्तकात त्यांनी गुंतवणूक गुरू वॉरन बफे गुंतवणुकीसाठी शेअर निवडताना कोणत्या चाळण्या लावतात, याचे उदाहरणासह सविस्तर वर्णन केले आहे.

वॉरन बफे यांची चेकलिस्ट अशी

१ कंपनीचा व्यवसाय समजण्यास सोपा आहे का?

२ व्यवसायात सातत्य आहे काय, म्हणजेच विक्री व नफा सातत्याने वाढतो आहे का?

३ व्यवसायाचे भवितव्य उज्ज्वल आहे का?

४ व्यवस्थापन तर्कशुद्ध निर्णय घेते का?

५ व्यवस्थापन भागधारकांना बऱ्यावाईट दोन्ही गोष्टी सांगते का?

६ व्यवस्थापन स्पर्धकांची नक्कल करते का?

७ भागधारकांच्या भांडवलावर कंपनी चांगला परतावा मिळवते का?

८ ‘अर्निंग्ज पर शेअर’पेक्षा ‘ओनर्स अर्निंग्ज’वर भर द्यावा.

९ ज्या कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण म्हणजे ‘मार्जिन’ अधिक आहे, अशाच कंपन्यांत गुंतवणूक करावी.

१० कंपनी जो नफा आपल्या व्यवसायातच गुंतवते, त्यामुळे कंपनीचे ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ कमीत कमी तेवढ्याच रकमेने वाढले आहे का?

११ कंपनीच्या व्यवसायाचे मूल्य किती आहे?

१२ या मूल्यापेक्षा खूप कमी किमतीला सध्या हा व्यवसाय किंवा शेअर उपलब्ध आहे का?

वरील सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सकारात्मक आली तरच वॉरन बफे त्या कंपनीत गुंतवणूक करतात! ज्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या गुंतवणूक पद्धतीचा सखोल अभ्यास करायचा आहे, अशांसाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेलं, 30 वर्षीय डाॅक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत

पोलिसांनी गळा पकडला, मारहाण अन् शिविगाळ केली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबत भयानक घडलं; बोर्डाची चौकशीची मागणी

Kharif Season: खरीपपूर्वी शेतकऱ्यांना मोठा झटका! खतांच्या दरात मोठी वाढ, DAP-युरियाच्या तुटवड्याने चिंता वाढली

IAF Plane Crash हवाई दलाच्या विमानाचे लँडिंगनंतर दोन तुकडे, आगीचा भडका; ५ अधिकाऱ्यांचा मृत्यू

Inspector Manju: गावाकडच्या काकूंची सत्यावर माया; सेटवर येऊन चक्क सोन्याची वस्तू केली गिफ्ट!

SCROLL FOR NEXT