Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market: फक्त 7 रुपयांवर लिस्ट झालेल्या 'या' कंपनीत एकाच वर्षात 93 पट वाढ

एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 92,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजार अनेकदा गुंतवणूकदारांना खूप कमी वेळेत भरपूर पैसे मिळवून देतो. अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज (Ambar Protein Industries) हा असाच एक स्टॉक आहे, ज्याने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 92,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे.

अंबर प्रोटीन ही एक एफएमसीजी कंपनी आहे, जी 'अंकुर' या ब्रँड नावाने खाद्यतेल (Edible Oil) विकते. कंपनीचे मुख्यालय अहमदाबादमध्ये आहे आणि त्याची स्थापना 1992 मध्ये झाली. नुकत्याच संपलेल्या जून तिमाहीत कंपनीचा नफा मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 0.77 कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक 77 टक्क्यांनी वाढून 1.34 कोटी रुपये झाला आहे. (this company was listed by only 7 rupees have great profit in a year)

अंबर प्रोटीन इंडस्ट्रीजचा शेअर नुकताच बीएसईवर 687.10 रुपयांवर बंद झाला. ही कंपनी गेल्या वर्षीच बीएसईवर लिस्ट झाली आहे आणि 6 जुलै 2021 ला पहिल्यांदा ट्रेडिंग सुरू झाले. त्यावेळी या शेअरची किंमत फक्त 7.35 रुपये होती. म्हणजे, गेल्या दीड तिमाहीत त्याचे शेअर्स 9,248.30 टक्क्यांनी वाढले आहेत आणि त्याची किंमत 7.35 रुपयांवरून 687.10 रुपयांवर गेली आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 जुलै 2021 ला अंबर प्रोटीनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, ती गुंतवणूक आता 93.48 लाखावर गेली असती. अंबर प्रोटीनचे शेअर्स गेल्या एका वर्षात 4,655.02 वाढले आहेत. त्याच वेळी, 2022 च्या सुरुवातीपासून, त्याच्या शेअर्सची किंमत सुमारे 2,988.09 टक्क्यांनी वाढली आहे. तर गेल्या वर्षभरात त्यात 77.38 टक्के वाढ झाली आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने अंबर प्रोटीनच्या शेअर्समध्ये वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्या 1 लाखाचे 47.55 लाख झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2022 च्या सुरुवातीला 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 30.88 लाख रुपये झाले असते. एखाद्याने फक्त 1 महिन्यापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1.77 लाख रुपये झाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT