Share Market Latest Updates | Stock Market News Sakal
अर्थविश्व

Tata Group च्या 'या' शेअरमध्ये मिळेल 41% रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

चहा आणि मीठ कॅटेगिरीतील आघाडीच्या ब्रँडसह भारतीय व्यवसायातून कंपनीचा महसूल 70 टक्के आहे.

शिल्पा गुजर

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होताना दिसत आहेत. याच अस्थितरतेच्या काळात तुम्ही दमदार शेअरच्या शोधात असाल तर टाटा ग्रुपच्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड या शेअरचा विचार करु शकता.

ग्लोबल ब्रोकरेज रिसर्च फर्म जेफरीजने टाटा कंझ्युमरवर (TCPL) खरेदी सल्ला (Buy Rating) दिला आहे. बिझनेस कंसोलिडेशननंतर, टाटा कंझ्युमर (TCPL) एक मजबूत F&B कंपनीत ट्रान्सफॉर्म झाल्याचे जेफरीजचे म्हणणे आहे. चहा आणि मीठ कॅटेगिरीतील आघाडीच्या ब्रँडसह भारतीय व्यवसायातून कंपनीचा महसूल 70 टक्के आहे.

यासोबतच, कंपनी कडधान्य, नाश्ता इत्यादी प्रकारात मजबूत स्थितीत आहे. एकूणच, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये लीडर ब्रँड्सच्या मिक्‍स्‍ड प्रॉडक्‍ट्सचा समावेश आहे. याशिवाय हळूहळू वाढणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यवसायामुळे नफाही वाढला आहे.

कंपनीच्या युनिक पोर्टफोलिओसाठी चांगले मार्जिन दिसत असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. बरोबरीतील कंपनींच्या तुलनेत ही कंपनी मार्जिनच्या बाबतीत चांगल्या स्थितीत आहे. ब्रोकरेजने FY22-25E साठी EPS चा 17 टक्के CAGR चा अंदाज वर्तवत 'बाय' रेटिंग दिले आहे.

टाटा कंझ्युमरची (TCPL) स्थापना 2019 मध्ये टाटा ग्लोबल बेव्हरेजेस (TGB, चहा आणि कॉफी) आणि टाटा केमिकल्सच्या कंझ्युमर बिझनेस (मीठ आणि कडधान्य) यांच्या विलीनीकरणानंतर झाली.

41% पर्यंत वाढ अपेक्षित

जेफरीजने टाटा कंझ्युमर (TCPL) स्टॉकला 'बाय' रेटिंग दिले आहे. तसेच, 920 रुपयांचे (SoTP-based) टारगेट दिले आहे. हा स्टॉक 1060 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 9 जून रोजी शेअरची किंमत 754 रुपये होती. म्हणजेच, स्टॉकमध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 41 टक्के वाढ दिसू शकते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT