Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market Latest Updates | Stock Market News Sakal
अर्थविश्व

हे' शेअर्स देतील दमदार रिटर्न, तुमच्याकडे आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात पैसे गुंतवून तुम्हालाही चांगला नफा कमवायचा असेल तर योग्य शेअर्स निवडणे गरजेचे आहे. कारण चुकीचे शेअर्स तुम्हाला मोठा फटका देऊ शकतात. अशावेळी शेअर बाजारातील एक्स्पर्ट्सचा सल्ला तुमच्या कामी येऊ शकतो. (this share will give high returns in future check here)

आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी आज तुमच्यासाठी काही शेअर्स आणलेत. ज्यात पैसे गुंतवून तुम्हाला चांगला फायजा होऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या बँक निफ्टीमध्ये चांगला फायदा आहे, ज्यात तुम्ही 33,500 वर कॉल घेऊ शकता. अशा स्थितीत बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, त्यांनी एसबीआय कार्डमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

एसबीआय कार्ड स्टॉक (SBI Card) सध्या चांगल्या स्थितीत आहे, ज्याचा तुम्ही गुंतवणूकीसाठी विचार करू शकता आणि दमदार परतावा मिळवू शकता असे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी टाटा मोटर्समध्ये गुंतवणुकीचा सल्लाही दिला आहे.

ज्यामधूनही चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे. यामध्ये नेक्सॉन आणि युरोपचा व्यवसाय चांगला चालला आहे. तिसरा टाटा कंझ्युमर्सचा शेअर आहे, ज्यावर तज्ज्ञ संजीव भसीन यांना पुर्ण विश्वास आहे. त्याच वेळी, त्यांनी आरती इंडस्ट्रीजमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे.

टाटा मोटर्स फ्युचर्स (Tata Motors Fut)
सीएमपी (CMP) - 403.95 रुपये
टारगेट (Target) - 430 - रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 394 - रुपये

एसबीआय कार्ड्स फ्युचर्स (SBI Cards Fut)
सीएमपी (CMP) - 741.95 - रुपये
टारगेट (Target) - 765 - रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 718 - रुपये

टाटा कंझ्युमर्स फ्युचर्स (Tata Consumer Fut)
सीएमपी (CMP) - 744.20 - रुपये
टारगेट (Target) - 775 - रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 720 - रुपये

आरती इंडस्ट्रीज (Aarti Industries)
सीएमपी (CMP) - 697.45 - रुपये
टारगेट (Target) - 750/755 - रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 675 - रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Update: पुण्यात 1500 अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश

हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायचा...110 दिवसात 200 विमानात चोरले मौल्यवान दागिने,  अशी झाली अटक

Virat Kohli & Anushka Sharma: विरुष्काच्या कृतीने भारावले पापाराझी ; जोडीकडून मिळालेल्या सरप्राईज गिफ्टचं होतंय कौतुक...

व्हॅक्सिंगनंतर त्वचा कोरडी पडलीय? करू नका दुर्लक्ष, अशी घ्या काळजी

PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रशासन ‘अलर्ट’! एक हजाराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT