Nirmala Sitharaman  sakal
अर्थविश्व

Budget Meeting : 'या' कारणामुळे कामगार संघटनांचा अर्थसंकल्पपूर्व बैठकीवर बहिष्कार

निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पपूर्व बैठका घेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Budget 2023-24 : निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पपूर्व बैठका घेत आहेत. मात्र या अर्थसंकल्पपूर्व बैठकीवर 10 केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्रितपणे बहिष्कार टाकला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पपूर्व बैठका हा चेष्टेचा विषय बनवला आहे. असे केंद्रीय कामगार संघटनांचे म्हणणे आहे. केंद्रीय कामगार संघटनांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून ही माहिती दिली.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

10 केंद्रीय कामगार संघटनांनी त्यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, अर्थसंकल्पपूर्व बैठका हा एक विनोद आहे. आम्ही सर्वजण 28 नोव्हेंबर 2022 रोजी अर्थमंत्री सीतारामन यांच्यासोबतच्या ऑनलाईन प्री-बजेट सल्लागार बैठकीवर बहिष्कार टाकत आहोत. या बैठकीत बोलण्यासाठी योग्य वेळ देऊन प्रत्यक्ष भेटीची म्हणजेच समोरासमोर बैठक घेण्याची मागणी युनियनने केली आहे. प्रत्येक युनियनला 3 मिनिटे मिळतील, असे त्यांनी म्हटले आहे. हा एक विनोद आहे. शेवटी, तुम्हाला 3 मिनिटांत काय ऐकायचे आहे. आम्ही त्याचा भाग होण्यास नकार देतो. असे संघटनांनी म्हटले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कामगार संघटनांनी पत्रात म्हटले आहे की, आता देशभरातून कोरोना विषाणूचा नायनाट झाला आहे. त्यामुळे समोरासमोर का बोलता येत नाही, या सभेच्या आयोजनाच्या ऑनलाईन पद्धतीबाबत निराशा आहे. आणि अवघ्या 75 मिनिटांत 12 हून अधिक कामगार संघटनांना त्यांचे म्हणणे मांडायचे आहे.

10 केंद्रीय कामगार संघटनांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पासंदर्भात बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. अर्थमंत्र्यांना हे पत्र TUCC, SEWA, HMS, AICCTU, LPF, AIUTUC, UTUC, भारतीय मजदूर संघ, INTUC, AITUC, HMS, CITU या संघटनांसह 10 संघटनांच्या वतीने लिहिले आहे. 28 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते 12.15 या वेळेत कामगार संघटनांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक बोलावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT