Twitter Elon Musk
Twitter Elon Musk sakal
अर्थविश्व

Twitter Acquired : एलोन मस्क आणि पराग अग्रवाल यांच्यात शत्रुत्व? वाचा काय आहे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

गुरुवारी इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यामागचं कारण सांगितले की, आपण ट्विटर विकत घेतले आहे जेणेकरून आपल्या भावी पिढीमध्ये समान डिजिटल प्लॅटफॉर्म असावे, जिथे भिन्न विचारसरणी आणि श्रद्धा असलेले लोक कोणतीही हिंसा न करता चर्चा करू शकतील.

2022 हे वर्ष अनेक मोठ्या घटनांचे साक्षीदार आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात खळबळ माजली असतानाच, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर यांच्यातील कराराचीही खूप चर्चा झाली. मात्र, अनेक चढ-उतारानंतर अखेर 28 ऑक्टोबरला ट्विटरची कमान पूर्णपणे मस्कच्या हाती आली. सर्वप्रथम कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्यात आली.

भारतीय वंशाचे पराग अग्रवाल सुरुवातीपासूनच मस्कच्या विरोधात बोलत होते. मस्क यांनी ट्विटरसाठी बोली लावल्यापासून कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी अशी अनेक विधाने केली, ज्यामुळे दोघांमधील तणाव स्पष्टपणे उघड झाला. पराग अग्रवाल यांनी कराराची घोषणा होताच टाऊन हॉलमध्ये कर्मचाऱ्यांना सांगितले की, 'कंपनीचे भविष्य आता अंधारात आहे, मला माहित आहे की ती कोणत्या दिशेने जाईल.'

पराग अग्रवाल यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना ट्विटरवरून काढले जाईल अशी चर्चा चालू होती. 28 ऑक्टोबर 2022 रोजी एलोन मस्कने ट्विटर डील पूर्ण केली आणि त्यांनी सूत्र हातात घेताच पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवलन. त्यांच्यासोबत कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. याशिवाय कायदेशीर धोरण विभागाच्या प्रमुख विजया गडदे यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.

भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये ट्विटरचे सीईओ बनले होते. अग्रवाल 10 वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ट्विटरमध्ये रुजू झाले आणि 2017 मध्ये कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बनले. यानंतर जॅक डोर्सीच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल यांना कंपनीचे सीईओ बनवण्यात आले होते. मात्र सीईओ बनताच एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली आणि वर्षभरातच पराग अग्रवाल यांना कंपनीतून कमी करण्यात आले. त्यासोबत शुक्रवारी एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हणले की, 'पक्षी मुक्त झाला.'

कधी काय झालं, ते जाणून घेऊ

  • 31 जानेवारी : मस्कनं हळूहळू ट्विटरमध्ये आपली हिस्सेदारी वाढवण्यास सुरुवात केली. मार्चपर्यंत मस्कची ट्विटरमध्ये 5 टक्के भागीदारी होती.

  • 26 मार्च : मस्कनं पहिल्यांदा ट्विटर विकत घेण्याचे संकेत दिले. ट्विटच्या माध्यमातून मस्कनं ट्विटरवर प्रश्न उपस्थित केले. यासोबतच मस्क यांनी ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांची भेट घेतली.

  • 27 मार्च : मस्कनं ट्विटरच्या सीईओ आणि बोर्डाची भेट घेतली. यावेळी त्यांनी बोर्डमध्ये आपल्या समावेशाबाबत चर्चा केली.

  • 4 एप्रिल : ट्विटरनं सांगितलं की, 9 टक्के स्टेक विकत घेऊन मस्क ट्विटरचा सर्वात मोठा शेअरहोल्डर बनला आहे. त्यांच्याकडं $3 अब्ज किमतीचे 7.35 कोटी शेअर्स आहेत.

  • 5 एप्रिल : मस्कनं ट्विटरच्या बोर्डवर अटींसह काही मागण्या केल्या.

  • 9 एप्रिल : मस्क आणि सीईओ अग्रवाल यांच्या मैत्रीत पहिल्यांदाच तणाव निर्माण झाला. दोघांनी एकमेकांना ट्विटद्वारे प्रश्न विचारायला सुरुवात केली.

  • 11 एप्रिल : ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी जाहीर केलं की, मस्क ट्विटर बोर्डमध्ये सामील होणार नाहीत.

  • 14 एप्रिल : मस्कनं ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलरची ऑफर दिली.

  • 15 एप्रिल : ट्विटरनं मस्क यांना संरक्षणात्मक धोरण सांगितलं.

  • 21 एप्रिल : मस्कनं करारासाठी $46 अब्ज जमा केले.

  • 25 एप्रिल : मस्कनं ट्विटरला $44 बिलियनमध्ये खरेदी करण्याचा करार केला.

  • एप्रिल 29 : मस्कनं करारासाठी निधी देण्यासाठी टेस्लाचे $8.5 अब्ज किमतीचे शेअर्स विकले.

  • 6 जून : मस्कनं ट्विटरशी करार तोडण्याची धमकी दिली.

  • 12 जुलै : डीलमधून माघार घेण्यासाठी ट्विटरनं मस्कविरोधात कोर्टात दाद मागितली, मस्कही ट्विटरविरोधात कोर्टात पोहोचले.

  • 19 जुलै : कोर्टानं सांगितलं की, या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबरपासून सुरू होईल.

  • 5 ऑक्टोबर : मस्कनं जाहीर केलं की, ट्विटरबाबत पहिल्या प्रस्तावासह आम्ही पुढं जात आहोत आणि लवकरच करार पूर्ण करेल.

  • 6 ऑक्टोबर : न्यायालयानं 17 ऑक्टोबर रोजी सुनावणी पुढं ढकलली आणि दोन्ही बाजूंना करारावर पोहोचण्यास आणि 28 ऑक्टोबरपर्यंत करार पूर्ण करण्यास सांगितलं.

  • 26 ऑक्टोबर : मस्कनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात तो ट्विटर मुख्यालयात प्रवेश करताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT